मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime News : दारासमोर म्हशीनं घाण केल्यानं पुण्यात हाणामारी; धक्कादायक घटनेनं शहरात खळबळ

Pune Crime News : दारासमोर म्हशीनं घाण केल्यानं पुण्यात हाणामारी; धक्कादायक घटनेनं शहरात खळबळ

Sep 26, 2022, 04:22 PM IST

    • Pune Crime News : काही दिवसांपूर्वीच पोपटांच्या शिट्ट्यांचा त्रास होत असल्यानं पुण्यात पोपटमालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता म्हशीवरून दोन कुटुंबात हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे.
Bund Garden Pune Crime News (HT)

Pune Crime News : काही दिवसांपूर्वीच पोपटांच्या शिट्ट्यांचा त्रास होत असल्यानं पुण्यात पोपटमालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता म्हशीवरून दोन कुटुंबात हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे.

    • Pune Crime News : काही दिवसांपूर्वीच पोपटांच्या शिट्ट्यांचा त्रास होत असल्यानं पुण्यात पोपटमालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता म्हशीवरून दोन कुटुंबात हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे.

Bund Garden Pune Crime News : काही दिवसांपूर्वी पुण्यात पोपटाच्या आवाजाचा त्रास होत असल्यावरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या प्रकरणाची सोशल मीडियावर फार चर्चा झाली होती. परंतु आता म्हशीनं घरासमोर घाण केली म्हणून झालेल्या वादातून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना पुण्यातून समोर आली आहे. त्यामुळं आता या प्रकरणात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Local Train news : ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली

Akola Crime : अकोल्यात आरोपीला गंभीर मारहाण! पार्श्वभागात दांडा टाकला, आरोपीचा कोठडीतच मृत्यू; पाच जणांची बदली

Beed Murder : बीड हादरले! कौटुंबिक वादातून उशीने तोंड दाबून पत्नीला संपवले, नंतर स्वत:ही केली आत्महत्या

Baramati Crime : धक्कादायक! बारामतीत जोडप्याला लुटून नग्न केले; नको त्या अवस्थेत फोटो काढले

नेमकं काय झालं?

पुण्यातील बंडगार्डन परिसरात एका म्हशीनं हर्षल मल्लाव यांच्या घरासमोर एका म्हशीनं घाण केली होती. त्यानंतर त्यांनी म्हशीच्या मालकाला याचा जाब विचारला. परंतु त्यांच्यात शिवीगाळ झाल्यानं दोघांनी एकमेकांना मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर दोघांच्या नातेवाईकांनी हाणामारीत सहभाग घेतला. त्यावेळी कोण कुणाला मारत होतं, हेच कळत नव्हतं. परंतु काही स्थानिक तरुणांनी दोन्ही गटांना शांत करत प्रकरण मिटवलं. त्यावेळी जाब विचारणाऱ्या हर्षल मल्लाव यांना आणि म्हशीच्या मालकाला या मारहाणीत गंभीर दुखापत झालेली होती. त्यानंतर स्थानिक लोकांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.

त्यानंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत हर्षल मल्लाव, राहुल काची आणि यश मल्लाव या तिन आरोपींना अटक केली आहे. बंड गार्डन परिसरातील या भागात गेल्या अनेक वर्षांपासून म्हशींचा गोठा आहे. अनेकदा गुरांमुळं छोटे-मोठे वाद झालेले आहेत. परंतु कधीही मारामारी झालेली नव्हती. परंतु म्हशीनं घरासमोर घाण केल्याच्या कारणावरून थेट दोन कुटुंबात मारामारी झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या