मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  यंदाची आषाढीची पूजा देवेंद्र फडणवीस करतील; भाजप आमदारांचा कॉन्फिडन्स वाढला!

यंदाची आषाढीची पूजा देवेंद्र फडणवीस करतील; भाजप आमदारांचा कॉन्फिडन्स वाढला!

Jun 21, 2022, 06:00 PM IST

    • Jaykumar Gore: देवेंद्र फडणवीस हेच यंदा आषाढी एकादशीची पूजा करतील, असा विश्वास माणचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला आहे.
Devendra Fadnavis

Jaykumar Gore: देवेंद्र फडणवीस हेच यंदा आषाढी एकादशीची पूजा करतील, असा विश्वास माणचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला आहे.

    • Jaykumar Gore: देवेंद्र फडणवीस हेच यंदा आषाढी एकादशीची पूजा करतील, असा विश्वास माणचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला आहे.

‘देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील व यंदा पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीची पूजा देखील तेच करतील,’ असा विश्वास माणचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला आहे. (Jaykumar Gore says Devendra Fadnavis will return as CM)

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Crime : नाश्ता बनवला नाही म्हणून पत्नीच्या डोक्यात मारला हातोडा; कुर्ला येथील धक्कादायक घटना

Maharashtra Weather Update : राज्याला अवकाळी पावसाने झोडपले! पुणे, साताऱ्यात ऑरेंज तर उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट

Mumbai Local Mega Block : रविवारी प्रवासाचे नियोजन करताय? लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक

Pradeep Sharma : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना आधी जन्मठेप अन् आता ‘सुप्रीम’ दिलासा

राज्यसभा व विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या अतिरिक्त उमेदवारांनी मिळवलेला विजय व त्यानंतर शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजपमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. भाजपच्या अनेक आमदारांना सत्ता दृष्टिपथात दिसू लागली आहे. त्यांच्या बोलण्या-वागण्यातील आत्मविश्वासही वाढला आहे.

भूखंड हडपल्याच्या आरोपांमुळं सध्या वादात असलेले आमदार जयकुमार गोरे यांनी हाच विश्वास आज बोलून दाखवला. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळं राज्यातील सरकार अस्थिर झालंय का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, ‘सरकार अस्थिर झालंय की नाही यावर माझी प्रतिक्रिया इतकीच आहे की देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील. फार वेळ वाट पाहावी लागणार नाही. यंदाची आषाढी एकादशीची पूजा फडणवीस साहेब करतील हे बातमीही लवकरच येईल.’

२०१९च्या निवडणुकीच्या आधी काँग्रेस व राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन अनेक आमदार, खासदार भाजपमध्ये दाखल झाले होते. पुन्हा भाजप-शिवसेनेचीच सत्ता येणार, असा विश्वास या सगळ्यांना होता. यातील अनेकांना भाजपनं तिकीटही दिलं. मात्र, यापैकी बहुतेक पराभूत झाले. तर, काही विजयी झाले. मात्र, राज्यातील राजकीय समीकरणं अचानक बदलून महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि भाजपला सत्तेबाहेर जावं लागलं. त्यामुळं त्यांची कोंडी झाली होती. या आमदारांना आता सत्तेची चिन्हं दिसू लागल्यामुळं त्यांचे चेहरे फुलले आहेत.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या