मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Fadnavis VS Pawar : अजित पवारांना फडणवीसांचा धोबीपछाड; एका झटक्यात निर्णय फिरवला

Fadnavis VS Pawar : अजित पवारांना फडणवीसांचा धोबीपछाड; एका झटक्यात निर्णय फिरवला

Aug 30, 2023, 12:56 PM IST

    • Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांच्या निर्णयाला स्थगिती दिल्याने राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
Devendra Fadnavis VS Ajit Pawar (HT)

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांच्या निर्णयाला स्थगिती दिल्याने राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

    • Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांच्या निर्णयाला स्थगिती दिल्याने राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

Devendra Fadnavis VS Ajit Pawar : राष्ट्रवादीतून बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देवेंद्र फडणवीसांनी पहिलाच आणि मोठा झटका दिला आहे. साखर कारखानदारांच्या कर्जाच्या मुद्द्यावर अजित पवारांनी घेतलेला निर्णयाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळं आता शिंदे-फडणवीस सरकारमधील दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. परिणामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. कारण आता राष्ट्रवादी आणि भाजपच्या साखर सम्राट नेत्यांमध्ये सुप्त संघर्ष सुरू असल्याचं बोललं जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Panvel Rape: पॉर्न पाहून अल्पवयीन भावाचा मोठ्या बहिणीवर बलात्कार; गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उजेडात!

Mumbai Weather Update: मुंबई, ठाण्यात आज उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरकून घ्या मतदान

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

नेमकं प्रकरण काय आहे?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साखर कारखान्यांना एनसीडीसीकडून कर्ज देताना कडक बंधनं घातली होती. त्यामुळं भाजपच्या कारखानदार नेत्यांना त्याचा फटका बसत होता. परिणामी भाजपचे साखर सम्राट नेत्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेत या विषयावर तोडगा काढण्याची मागणी केली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी कर्जावरील जाटक अटी आणि बंधन हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयाला देवेंद्र फडणवीसांनी स्थगिती दिल्याने सरकारमधील नेत्यांमध्ये काहीही आलबेल नसल्याचं बोललं जात आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून घेण्यात आलेल्या निर्णयामध्ये कर्जासाठी कारखान्यांच्या जागेच्या सातबाऱ्यावर कर्जाचा बोजा चढवावा तसेच वैयक्तिक सामूहिक जबाबदारी हमीपत्र देण्याची अट घालण्यात आली होती. त्यामुळं हर्षवर्धन पाटील, राहुल कुल आणि धनंजय महाडिक हे भाजपचे पश्चिम महाराष्ट्रातील नेते अडचणीत आले होते. तसेच केंद्रीय मंत्री आणि मराठवाड्यातील भाजपचा प्रमुख चेहरा असलेले रावसाहेब दानवे यांच्याही अडचणीत वाढ झाली होती. त्यामुळं आता या नेत्यांच्या विनंतीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांचा निर्णय फिरवत भाजपच्या नेत्यांना दिलासा दिला आहे. या निर्णयामुळं सरकारमधील नेत्यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्यास सुरुवात केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

पुढील बातम्या