मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप-मनसे युती होणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले..

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप-मनसे युती होणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले..

Apr 29, 2022, 08:33 PM IST

    • राज ठाकरे जूनच्या पहिल्या आठवड्यात  अयोध्येला जाणार आहेत. त्यावेळी ते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटतील. त्यामुळे भाजप-मनसेच्या युतीची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत भाजप नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 
भाजप-मनसे युती?

राज ठाकरे जूनच्या पहिल्या आठवड्यात अयोध्येला जाणार आहेत. त्यावेळी ते मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथयांना भेटतील. त्यामुळे भाजप-मनसेच्या युतीची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत भाजप नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    • राज ठाकरे जूनच्या पहिल्या आठवड्यात  अयोध्येला जाणार आहेत. त्यावेळी ते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटतील. त्यामुळे भाजप-मनसेच्या युतीची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत भाजप नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप-मनसे युतीच्या चर्चांना पूर्णविराम देत ही युती होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मागील काही दिवसांपासून हनुमान चालिसा व मशिदीवरील भोंग्यांवरून सुरु असलेल्या राजकारणानंतर अंदाज वर्तवले जात होते की, भाजप व मनसे एकत्र येऊन आगामी निवडणुका लढू शकतात. म्हटले जात होते की, बीएमसी निवडणुकीत शिवसेनेला हटवण्यासाठी भाजप मनसेला जवळ करू शकतो. 

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Weather Update: मुंबई, ठाण्यात आज उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरकून घ्या मतदान

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

याविषयी प्रश्न विचारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अशा कोणत्याही शक्यतेला धुडकावून लावले. फडणवीस म्हणाले की, दोन्ही पक्षामध्ये अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. राज ठाकरे यांनी आमचा लाउड स्पीकरचा मुद्दा जरुर उचलला आहे, मात्र युतीबाबतच्या चर्चा निराधार आहेत. 

त्याचबरोबर काही दिवसापूर्वी भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटले होते की, २०१७ मध्ये भाजप राष्ट्रवादीसोबत सरकार बनवणार होता. मंत्रिपदे तसेच पालकमंत्रीही ठरले होते. मात्र एनवेळी शिवसेनेसोबत युती कायम ठेवावी लागली. २०१७ मध्ये नेमकं काय घडलं होतं? यासंदर्भात फडणवीसांना विचारणा केली असता त्यांनी “जो बीत गई, वो बात गई” अशी एका वाक्यात प्रतिक्रिया देत या विषयावर सविस्तर भूमिका मांडण्यास बगल दिली. यावेळी मनसेसोबत युतीच्या चर्चांमध्ये किती तथ्य आहे? असं विचारलं असता त्यावर फडणवीसांनी भाजपाची भूमिका स्पष्ट केली.

फडणवीस म्हणाले की, मनसेसोबत युतीच्या बातम्या कपोलकल्पित आहेत. काही लोकांनी मुद्दाम सोडलेल्या बातम्या आहेत. आमची अजून कोणतीही औपचारिक चर्चा झालेली नाही. एक गोष्ट मात्र नक्की आहे, की अलिकडच्या काळात राज ठाकरेंनी घेतलेल्या बहुतांश भूमिका आमच्याही राहिलेल्या आहेत. पण आमची कोणतीही औपचारिक चर्चा झालेली नाही. त्यामुळे आत्ता त्यावर येणाऱ्या प्रतिक्रिया फारच अपरिपक्व आहेत.

दुसरीकडे मनसे नेते यशवंत केळकर यांनीही भाजप-मनसे यांच्यात युतीच्या बातम्या निराधार असल्याचे म्हटले. केळकर म्हणाले की, जर भाजपला मनसेची साथ हवी असेल तर आम्ही त्यांचे स्वागत करतो. राज ठाकरे जूनच्या पहिल्या आठवड्यात  अयोध्येला जाणार आहेत. त्यावेळी ते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटतील. त्यामुळे भाजप-मनसेच्या युतीची शक्यता वर्तवली जात आहे. 

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या