मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Akola : अंत्यसंस्कारावेळी तरुण तिरडीवर उठून बसला! अकोल्यातील घटनेनं पळापळ आणि खळबळ

Akola : अंत्यसंस्कारावेळी तरुण तिरडीवर उठून बसला! अकोल्यातील घटनेनं पळापळ आणि खळबळ

Oct 27, 2022, 04:17 PM IST

    • Akola Viral News Marathi : डॉक्टरांनी तरुणाची वैद्यकीय तपासणी करून त्याला मृत घोषित केलं होतं. तरुणाच्या नातेवाईकांनी जेव्हा अंतयात्रा काढली तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
Akola Viral News Marathi (HT)

Akola Viral News Marathi : डॉक्टरांनी तरुणाची वैद्यकीय तपासणी करून त्याला मृत घोषित केलं होतं. तरुणाच्या नातेवाईकांनी जेव्हा अंतयात्रा काढली तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

    • Akola Viral News Marathi : डॉक्टरांनी तरुणाची वैद्यकीय तपासणी करून त्याला मृत घोषित केलं होतं. तरुणाच्या नातेवाईकांनी जेव्हा अंतयात्रा काढली तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

Akola Viral News Marathi : मृत व्यक्तीची अंतयात्रा सुरू असतानाच मृत तरुण अचानक तिरडीवर उठून बसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळं अकोला जिल्ह्यातील विवरा गावात खळबळ उडाली असून शिवारात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. प्रशांत मेसरे (२३) असं तरुणाचं नाव असून जेव्हा तो अंत्ययात्रा सुरू असताना तिरडीवर उठून बसला तेव्हा गावकऱ्यांची मोठी धावपळ झाल्याचं पाहायला मिळालं.

ट्रेंडिंग न्यूज

Narendra Dabholkar Case : नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाच्या निकालावर अंनिस अन् दाभोलकर कुटुंबियांची भूमिका

Weather Update: मुंबईत ४ ते ५ दिवस अवकाळीची शक्यता; पुणे, संभाजीनगर, सांगली , नगरसह अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपले

MPSC Exam : राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर; लोकसेवा आयोगाकडून सुधारित वेळापत्रक आलं समोर

SSC, HSC 2024 Result: इयत्ता दहावी, बारावीचा निकाल आज जाहीर होणार नाहीत, महाराष्ट्र बोर्डाकडून स्पष्ट!

मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातील पातूर तालुक्यातल्या विवरा गावात होमगार्ड असलेले प्रशांत मेसरे हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यामुळं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी प्रशांत यांना मृत घोषित केलं. त्यानंतर नातेवाईकांनी प्रशांत यांचा मृत्यू झाल्याचं समजून त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. गावातील नागरिकांसह नातेवाईकांनी प्रशांत यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांना स्मशानभूमीत नेत असताना ते तिरडीवर अचानक उठून बसले. त्यामुळं अंत्ययात्रेत आलेल्या लोकांनी हे दृश्य पाहिल्यावर एकच धावपळ उडाली.

त्यानंतर अंत्ययात्रेतील काही लोकांनी मोठ्या हिमतीनं प्रशांतला एका मंदिरात नेलं. त्यानंतर विवरा गावाच्या शिवारात ही बातमी वाऱ्यासारखी परसल्यानं अनेक लोकांनी त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या