मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dasara Melava: शिवसेना लढण्याच्या मूडमध्ये; दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरेंची हटके रणनीती

Dasara Melava: शिवसेना लढण्याच्या मूडमध्ये; दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरेंची हटके रणनीती

Sep 19, 2022, 05:57 PM IST

    • Dasarav Melava: दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावर कोणत्याही परिस्थिती माघार घ्यायची नाही असा निर्धार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्याचं समजतं.
Thackeray

Dasarav Melava: दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावर कोणत्याही परिस्थिती माघार घ्यायची नाही असा निर्धार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्याचं समजतं.

    • Dasarav Melava: दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावर कोणत्याही परिस्थिती माघार घ्यायची नाही असा निर्धार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्याचं समजतं.

शिवसेनेतील बंडाळीनंतर फुटीर गटानं मूळ पक्षावर हक्क सांगितल्यानं नवा पेच निर्माण झाला आहे. हा पेच सुटला नसतानाच आता दसरा मेळाव्यावरून शिवसेना व एकनाथ शिंदे गट आमनेसामने आले आहेत. मेळाव्यासाठी दोन्ही गटानी शिवाजी पार्क मैदानावर दावा केला आहे. या वादामुळं कोणालाही मैदान न देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. अशी परिस्थिती उद्भवल्यास मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी वेगळीच रणनीती आखली आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

दसरा मेळावा हा शिवसेनेच्या स्थापनेपासून प्रतिवर्षी होणारा मेळावा आहे. क्वचितच ही परंपरा खंडित झालीय. एक नेता, एक मैदान… अशी या मेळाव्याची ओळख बनली आहे. बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे ही परंपरा जपत आले आहेत. मात्र, यंदा शिवसेनेतील फुटीमुळं ही परंपरा मोडली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना कुणाची? हा प्रश्न निवडणूक आयोगासमोर असला तरी शिवसैनिकांच्या दृष्टीनं मैदानातील लढाईला खरं महत्त्व आहे. त्यामुळं शिवतीर्थावर जो कोणी दसरा मेळावा घेणार, तीच खरी शिवसेना असा संदेश आपसूकच जाणार आहे. उद्धव ठाकरे यांनी हे ओळखलं आहे. त्यामुळंच त्यांनी कोणत्याही परिस्थितीत दसरा मेळावा शिवतीर्थावरच घेण्याचा चंग बांधला आहे.

दसऱ्याच्या दिवशी शिवतीर्थावर जमण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले आहेत. तूर्त ते महापालिकेच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. त्यानंतर न्यायालयात दाद मागितली जाणार आहे. तिथंही काही तोडगा न निघाल्यास शिवतीर्थावरच मेळावा घेण्याची रणनीती आखल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या माहितीनुसार, दसऱ्याच्या दिवशी सर्व शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी एकत्र येतील. तिथंच चौकात उभे राहून उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांशी संवाद साधतील. शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी टॅक्सीवर उभं राहून भाषण केलं होतं, त्याच पद्धतीनं उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील, असं बोललं जात आहे. अर्थात, याकडं शेवटचा पर्याय म्हणून पाहिलं जात आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या