मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rahul Gandhi: राहुल गांधी यांना अध्यक्ष बनविण्यासाठी राज्याराज्यांतून दबाव; महाराष्ट्रात झाला ठराव

Rahul Gandhi: राहुल गांधी यांना अध्यक्ष बनविण्यासाठी राज्याराज्यांतून दबाव; महाराष्ट्रात झाला ठराव

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Sep 19, 2022 05:21 PM IST

Rahul Gandhi: राहुल गांधींची नियुक्ती राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी करावी यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ठराव मांडला. याला प्रदेश कार्याध्यक्ष आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे आणि नसीम खान यांनी अनुमोदन दिले.

काँग्रेस नेते राहुल गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधी (फोटो - पीटीआय)

Rahul Gandhi: काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी लवकरच निवडणूक होणार आहे. दरम्यान, त्याआधी राज्याराज्यांमधून राहुल गांधी यांनाच अध्यक्ष करावं यासाठी दबाव टाकण्यात येत आहे. राजस्थान, दिल्ली, छत्तीसगढ या राज्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसने राहुल गांधी यांनाच पक्षाचे अध्यक्ष करावे असा ठराव मंजूर केला आहे. यासंदर्भात पक्षाच्या प्रदेश प्रतिनिधींची बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती. यावेळी एकमताने हा ठराव मंजूर झाला.

महाराष्ट्र काँग्रेसच्या नवनिर्वाचित प्रदेश प्रतिनिधींच्या बैठकीला प्रदेश निवडणूक अधिकारी, माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू, प्रदेश प्रभारी एचके पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधीमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह इतर नेते मंडळी उपस्थित होते. राहुल गांधींची नियुक्ती राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी करावी यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ठराव मांडला. याला प्रदेश कार्याध्यक्ष आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे आणि नसीम खान यांनी अनुमोदन दिले. तसंच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष, पदाधिकारी, कोषाध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सदस्यांच्या निवडीचे अधिकार काँग्रेस अध्यक्षांना देण्याचा ठराव मांडला. हा ठरावसुद्धा प्रदेश प्रतिनिधींकडून मंजूर करण्यात आला.

गुजरात, राजस्थान आणि छत्तीसगढमध्येही ठराव मंजूर
गुजरात काँग्रेसनेसुद्धा राहुल गांधी यांनाच पक्षाचे अध्य़क्ष करावं अशी मागणी केली आहे. राहुल गांधी यांच्याकडे नेतृत्व सोपवावं अशी मागणी सातत्याने केली जात आहे. पुढच्या महिन्यात अध्यपदाची निवडणूक होणार असून त्याआधीच विविध राज्यांमधून राहुल गांधी यांच्या नावासाठी दवाब टाकला जात आहे. दुसऱ्या बाजुला राहुल गांधी हे भारत जोडो यात्रा काढत आहेत. देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा १५० दिवसांत काश्मीरमध्ये पोहोचणार आहे.

शनिवारी राजस्थानच्या काँग्रेस समितीने एकमताने राहुल गांधी हेच राष्ट्रीय अध्यक्ष असावेत यासाठी ठराव मंजूर केला. तर त्यानंतर छत्तीसगढ काँग्रेसने रविवारी यासदंर्भात ठरव मंजूर केला. काँग्रसने गेल्या महिन्यात स्पष्ट सांगितलं होतं की, १७ ऑक्टोबरला राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक होईल. त्यानंतर १९ सप्टेंबरला याचा निकाल जाहीर होईल.

राहुल गांधींच्या नेतृत्वाला विरोध
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालीच काँग्रेसने २०१९ ची लोकसभा निवडणूक लढली होती. निवडणुकीत पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून सोनिया गांधी या हंगामी अध्यक्ष आहेत. दरम्यान, पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांनी राहुल गांधी यांच्यावर आरोप केले. काही नेत्यांनी पक्षही सोडला. नुकतंच काश्मीरमधील नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी दिली. यावेळी त्यांनी राहुल गांधी हे बालिश असल्याची टीका केली होती. काँग्रेसमधील जी२३ गटाच्या नेत्यांनी पक्षात नव्या बदलांची गरज असल्याचं मत मांडलं होतं. तसंच पक्षात दिग्गज नेत्यांचे मत लक्षात घेतले जात नसल्याचा आरोप या नेत्यांनी केला होता.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या