मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  RSS च्या ९७ वर्षांच्या विजयादशमी कार्यक्रमाच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच घडणार 'ही' गोष्ट

RSS च्या ९७ वर्षांच्या विजयादशमी कार्यक्रमाच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच घडणार 'ही' गोष्ट

Oct 04, 2022, 10:56 PM IST

    • यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) विजयादशमी कार्यक्रम विशेष असणार आहे. संघाच्या मागील तब्बल ९७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच विजयादशमीच्या कार्यक्रमात संघाने आपली परंपरा बाजुला ठेऊन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून एका महिलेला आमंत्रित केले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा(RSS)विजयादशमी कार्यक्रम

यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा(RSS)विजयादशमी कार्यक्रम विशेष असणार आहे. संघाच्या मागील तब्बल९७वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच विजयादशमीच्याकार्यक्रमात संघाने आपली परंपरा बाजुला ठेऊनकार्यक्रमासाठीप्रमुख पाहुण्या म्हणूनएकामहिलेलाआमंत्रितकेले आहे.

    • यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) विजयादशमी कार्यक्रम विशेष असणार आहे. संघाच्या मागील तब्बल ९७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच विजयादशमीच्या कार्यक्रमात संघाने आपली परंपरा बाजुला ठेऊन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून एका महिलेला आमंत्रित केले आहे.

नागपूर - यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा(RSS) विजयादशमी (Dasara 2022) कार्यक्रम विशेष असणार आहे. संघाच्या मागील तब्बल ९७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच विजयादशमीच्या कार्यक्रमात संघाने आपली परंपरा बाजुला ठेऊन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून एका महिलेलाआमंत्रितकेले आहे. या कार्यक्रमाला पद्मश्री पुरस्कार विजेत्या संतोष यादव (santosh Yadav) या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मुख्यालय (Dussehra festival program of rss) असलेल्या नागपुरातील विजयादशमी संचलनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष असते. विजयादशमीच्या दिवशी सरसंघचालक संघाची आगामी काळातील वाटचाल,स्वयंसेवकांचे कोणत्या क्षेत्रात कार्य करावं, संघ कार्यासमोरील आव्हानं, देशाच्या तसंच जागतिक क्षेत्रातील ताज्या घडामोडीवर संघाची अधिकृत भूमिका विजयादशमीच्या दिवशी होणाऱ्या भाषणामध्ये सरसंघचालक डॉ. मोहन भागवत स्पष्ट करतात. त्यामुळे या भाषणाची सर्वांनाच उत्सुकताअसते.

नागपूरमध्ये दसऱ्या निमि्त होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात पहिल्यांदाच एक महिला दिसून येणार आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर नेहमीच महिलांना त्यांच्या संघटनेत नसलेल्या स्थानावरून टीका केली जाते. आता संघाकडून दसरा मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणी म्हणून गिर्यारोहक  संतोष यादव यांना मान दिला जाणार आहे. संघाचे महासचिव दत्तात्रय होसाबळे यांनी संघाच्या एका बैठकीत महिलांच्या सहभागावरून खंत व्यक्त केली होती. यातच राष्ट्रीय स्वंयसेवक संघाकडून आता जाहीर करण्यात आले आहे की गिर्यारोक संतोष यादव संघाच्या वार्षिक दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित असतील.

कोण आहेत संतोष यादव?

संतोष यादव या मूळच्या हरयाणाच्या आहेत. दोन वेळा जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टवर चढाई करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. त्यांनी १९९२ आणि १९९३ मध्ये एव्हरेस्ट शिखर सर केलं होतं. सामाजिक बंधने असतानाही त्यांनी शिक्षण घेतलं आणि त्यानंतर एव्हरेस्ट शिखर सर करत आपली ओळख निर्माण केली. भारत सरकारने त्यांना २००० मध्ये पद्म श्री पुरस्काराने गौरवलं होतं.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या