मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Karnataka New CM : कर्नाटकातील मुख्यमंत्री महाराष्ट्रातील ‘हा’ नेता निवडणार, काँग्रेसच्या बैठकीत होणार घोषणा

Karnataka New CM : कर्नाटकातील मुख्यमंत्री महाराष्ट्रातील ‘हा’ नेता निवडणार, काँग्रेसच्या बैठकीत होणार घोषणा

May 14, 2023, 06:18 PM IST

    • Karnataka New CM : कर्नाटकातील मुख्यमंत्र्याची निवड करण्याची जबाबदारी महाराष्ट्रातील दिग्गज नेत्याकडे सोपवण्यात आली आहे.
Congress President Mallikarjun Kharge with Karnataka Congress President DK Shivakumar and senior party leader Siddaramaiah (PTI)

Karnataka New CM : कर्नाटकातील मुख्यमंत्र्याची निवड करण्याची जबाबदारी महाराष्ट्रातील दिग्गज नेत्याकडे सोपवण्यात आली आहे.

    • Karnataka New CM : कर्नाटकातील मुख्यमंत्र्याची निवड करण्याची जबाबदारी महाराष्ट्रातील दिग्गज नेत्याकडे सोपवण्यात आली आहे.

Karnataka New CM Name : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने तब्बल १३५ जागा जिंकत भाजपाचा दारुण पराभव केला आहे. त्यानंतर आता काँग्रेसने सर्व विजयी आमदारांना हैदराबादमध्ये हलवलं असून मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा झाल्यानंतर राज्यपालांकडे बहुमताचा दावा करण्यात येणार आहे. कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदासाठी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांचं नाव चर्चेत आहे. याशिवाय माजी केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली यांनी देखील मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळं आता विधानसभेत बहुमत मिळाल्यानंतर कर्नाटकात काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी धुसफूस सुरू झाली आहे. त्यातच आता कर्नाटकात मुख्यमंत्री निवडण्याचे अधिकार महाराष्ट्रातील दिग्गज नेत्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Parbhani News : परभणी हादरली! तू माझ्या पत्नीसारखीच म्हणत सासऱ्याचा सुनेवर बलात्कार

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या, एका क्लिकवर पाहा तुमचं रिझल्ट

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Kolhapur Murder : भरदिवसा आईच्या डोळ्यादेखत तरुणाला संपवलं; सैन्य दलातील जवानासह तिघे आरोपी फरार

कर्नाटकात मुख्यमंत्री कुणाला करायचं, यासाठी काँग्रेसने विधीमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. त्यात विजयी आमदारांची मतं जाणून घेण्यात येणार आहे. तसेच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचं या प्रक्रियेकडे विशेष लक्ष असणार आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांनी कर्नाटकातील मुख्यमंत्री निवडण्यासाठी तीन नेत्यांची नियुक्ती केली आहे. त्यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, काँग्रेस नेते दीपक बाबरिया आणि जितेंद्र सिंह यांचं निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उद्या दुपारपर्यंत हे तिन्ही नेते आमदारांची मतं जाणून घेतील, त्यानंतर नव्या मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर केलं जाणार असल्याची माहिती आहे.

कर्नाटकातील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचं नाव आघाडीवर आहे. पक्षातील जेष्ठ नेते आणि बहुतेक आमदारांचा सिद्धरामय्या यांना पाठिंबा असल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे डीके शिवकुमार यांनी थेट राहुल गांधी यांच्याशी संपर्क केल्याची माहिती आहे. त्यामुळं आता कर्नाटकातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.

पुढील बातम्या