मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  द्रौपदी मुर्मूंना राज्यातून २०० मते मिळाली नसली तरी… : CM एकनाथ शिंदे

द्रौपदी मुर्मूंना राज्यातून २०० मते मिळाली नसली तरी… : CM एकनाथ शिंदे

Jul 22, 2022, 09:38 AM IST

    • द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्रातून २०० मते मिळतील असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्रातून २०० मते मिळतील असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता.

    • द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्रातून २०० मते मिळतील असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता.

President Of India: राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना महाराष्ट्रातून २०० मते मिळतील असा दावा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला होता. मात्र प्रत्यक्षात द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्रातून १८४ मते मिळाली. याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांना विचारले असता त्यांनी मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली. राज्यातून २०० मतं मिळाली नसली तरी भरपूर मिळाली असं ते म्हणाले.

ट्रेंडिंग न्यूज

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

Pune Crime News : पुण्यात मुली असुरक्षित! आधी ड्रग्जसोबत दारु पाजली नंतर लॉजवर नेऊन केले कांड! दोघींवर बलात्कार

Maharashtra Weather Update: पुणे, कोल्हापूर, सातारा, नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता! मुंबईत उकाडा कायम

महाराष्ट्रातून त्यांना जास्ती मते मिळाली आहेत. कारण आदिवासी समाजाबद्दल, आदिवासी महिला म्हणून राष्ट्रपतीच्या पदासाठी त्यांना अनेकांनी मतदान केलं. पाच लाख ७७ हजार ७१७ मते मिळाली. उमेदवाराचा दारुण पराभव झालाय. महाराष्ट्रातून भरपूर मते मिळाली आहेत. द्रौपदी मुर्मू विक्रमी मते घेऊन निवडून आल्या आहेत अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकारला विश्वासमतावेळी १६४, तर विरोधकांना ९९ मतं मिळाली होती. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे किमान १८५ मते महाराष्ट्रातून द्रौपदी मुर्मू यांना अपेक्षित होती. मात्र, शिंदे गटातील एक आमदार मतदान करू न शकल्यानं १८४ मते पडली. शिवसेनेच्या पाठिंब्यानंतरही महाराष्ट्रातून १८४ च्या वर मते पडू शकली नाही कारण चार मते बाद ठरली. तसंच मुख्यमंत्र्यांनी मिशन २०० चा केलेला दावाही फोल ठरला.

द्रौपदी मुर्मू यांना ५४० खासदारांची मते मिळाली तर राज्यांकडून २२८४ मते मिळाली. त्यांना मिळालेल्या एकूण मतांची संख्या २८२४ इतकी होती. तर पराभूत झालेल्या यशवंत सिन्हा यांना २०८ खासदारांची आणि राज्यातील १६९९ मते मिळाली. इलेक्टोरल मते पाहता द्रौपदी मुर्मू यांना ६ लाख ७६ हजार ८०३ तर यशवंत सिन्हा यांना ३ लाख ८० हजार १७७ मते पडली.

पुढील बातम्या