मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde : निकालावर प्रश्न विचारताच मुख्यमंत्र्यांनी हात जोडले, एकनाथ शिंदेंच्या शुभेच्छा नेमक्या कुणाला?

Eknath Shinde : निकालावर प्रश्न विचारताच मुख्यमंत्र्यांनी हात जोडले, एकनाथ शिंदेंच्या शुभेच्छा नेमक्या कुणाला?

May 11, 2023, 10:12 AM IST

    • Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील १६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टातून थोड्याच वेळात निकाल येणार आहे.
CM Eknath Shinde On Supreme Court Hearing On Maharashtra Political Crisis (ANI)

Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील १६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टातून थोड्याच वेळात निकाल येणार आहे.

    • Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील १६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टातून थोड्याच वेळात निकाल येणार आहे.

CM Eknath Shinde On Supreme Court Hearing On Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणांवर आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास सुप्रीम कोर्टातून निकाल येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील १६ आमदारांच्या अपात्रतेवर सुप्रीम कोर्ट निकाल देणार असल्यामुळं काल संध्याकाळ पासून महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालावर प्रतिक्रिया देणं टाळत फक्त हात जोडत शुभेच्छा दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं आता मुख्यमंत्र्यांनी नेमक्या कुणाला शुभेच्छा दिल्या, यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयासमोर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला

Worli Rape: नोकरीचे आमिष दाखवत तरुणीला जाळ्यात अडकवलं, भेटायला बोलवून बलात्कार; वरळीतील घटना

Manoj jarange patil : अन्यथा २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; जरांगेंनी विधानसभेचा फॉर्म्युलाच सांगितला

Pandharpur news : भाविकांसाठी आनंदवार्ता! पंढरपूरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन ‘या’ तारखेपासून पुन्हा होणार सुरू

मुख्यमंत्री एकनात शिंदे हे शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे यांच्या मुलीच्या लग्नासाठी जळगावात दौऱ्यावर आले आहे. त्यावेळी सुप्रीम कोर्टातील निकालाबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारला. त्यावेळी एकनाथ शिंदेंनी सर्वांना शुभेच्छा असल्याचं सांगत हात जोडले. त्यानंतर ते पत्रकारांच्या कोणत्याही प्रश्नांना उत्तरं न देता पुढील कार्यक्रमांसाठी निघून गेले. त्यामुळं आता मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा कुणासाठी होत्या?, असा सवाल उपस्थित केला जात आहे. सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरवलं तर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळण्याची शक्यता आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय भविष्याचा आज सुप्रीम कोर्टातून फैसला होणार आहे. शिवसेनेतील बंडखोर आमदारांची अपात्रता, राज्यपालांची भूमिका आणि शिवसेना कुणाची, याबाबत सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड हे निकाल देणार आहे. खंडपीठातील पाच न्यायाधीशांचं निकालाबाबत एकमत झालं आहे. त्यामुळं आता सुप्रीम कोर्ट राज्यातील सत्तासंघर्षाच्या बाबतीत काय निकाल देणार, याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे.

पुढील बातम्या