मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार गजानन किर्तीकरांच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार गजानन किर्तीकरांच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण

Jul 21, 2022, 02:01 PM IST

    • CM Eknath Shinde : मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंशी एकनिष्ठ असलेल्या कोणत्याही नेत्याची भेट घेतली नव्हती. परंतु त्यांनी आता खासदार गजानन किर्तीकरांची भेट घेतल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
CM Eknath Shinde Meet To Gajanan Kirtikar (HT)

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंशी एकनिष्ठ असलेल्या कोणत्याही नेत्याची भेट घेतली नव्हती. परंतु त्यांनी आता खासदार गजानन किर्तीकरांची भेट घेतल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

    • CM Eknath Shinde : मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंशी एकनिष्ठ असलेल्या कोणत्याही नेत्याची भेट घेतली नव्हती. परंतु त्यांनी आता खासदार गजानन किर्तीकरांची भेट घेतल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

CM Eknath Shinde Meet To Gajanan Kirtikar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेना खासदार आणि ठाकरेंशी एकनिष्ठ राहिलेल्या गजानन किर्तीकरांची भेट घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून शिंदेगटात आणि शिवसेनेतला राजकीय संघर्ष पाहता ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. त्याचबरोबर या भेटीनंतर ठाकरे आणि शिंदे यांच्यातील वितुष्ट संपणार का, अशाही चर्चा सुरू झाल्या आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शिवसेनेच्या अनेक स्थानिक नेत्यांनी शिंदेगटात प्रवेश करायला सुरुवात केली आहे. यात ठाणे, कोंकण आणि मराठवाड्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळं शिवसेना आणि शिंदेगटातील संघर्ष टोकाला गेल्याचं पाहायला मिळालं होतं. याशिवाय दिपाली सय्यद यांनी ठाकरे आणि शिंदे यांच्यात भेट घडवून आणणार असल्याचं वक्तव्य केल्यानं शिवसेनेतील राजकीय संघर्ष थांबणार का, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. परंतु आता मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार किर्तीकर यांच्या भेटीमुळं या चर्चांना पुन्हा वेग आला आहे.

किर्तीकर होते आजारी...

शिवसेना खासदार गजानन किर्तीकर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळं शिंदे यांनी त्यांची विचारपूस करण्यासाठी भेट घेतली असावी, अशी माहिती मिळत आहे. परंतु वैयक्तिक असली तरी त्यात राजकीय चर्चा होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. गजनान कीर्तिकर यांनी यापूर्वी सरकारमधील निधीवाटपावरून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीवर टीका केली होती. ते नाराज होते. त्यामुळं ते गळाला लागतात का याचीही चाचपणी शिंदे गटाकडून सुरू आहे.

दिल्लीत घेतली होती पत्रकार परिषद...

शिंदेगटाच्या १२ खासदारांनी लोकसभेतील गटनेता निवडण्यासाठी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह खासदार गजानन किर्तीकर यांनी दिल्लीत राऊतांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन त्यात शिंदेगटाचा गटनेता आणि प्रतोद निवडण्याचा दावा अवैध असल्याचं सांगितलं होतं. परंतु आता लोकसभाध्यक्षांनी शिंदेगटाची मागणी मान्य करत राहुल शेवाळे यांना लोकसभेच्या गटनेतेपदावर नियुक्ती केली आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या