मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  'शिंदेंनी इथून निवडणूक जिंकली तर बापाचं नाव लावणार नाही'; शिवसैनिकाचं ओपन चॅलेंज

'शिंदेंनी इथून निवडणूक जिंकली तर बापाचं नाव लावणार नाही'; शिवसैनिकाचं ओपन चॅलेंज

Jul 21, 2022, 10:14 AM IST

    • CM Eknath Shinde : 'माझ्या विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरी निवडणूक लढवली तरी इथून ठाकरेंशी एकनिष्ठ असणारा शिवसैनिकच आमदार होईल', असा दावा शिवसेना नेत्यानं केला आहे.
Political Crisis In Shivsena (HT)

CM Eknath Shinde : 'माझ्या विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरी निवडणूक लढवली तरी इथून ठाकरेंशी एकनिष्ठ असणारा शिवसैनिकच आमदार होईल', असा दावा शिवसेना नेत्यानं केला आहे.

    • CM Eknath Shinde : 'माझ्या विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरी निवडणूक लढवली तरी इथून ठाकरेंशी एकनिष्ठ असणारा शिवसैनिकच आमदार होईल', असा दावा शिवसेना नेत्यानं केला आहे.

Political Crisis In Shivsena : शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून शिंदेगट आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये शाब्दिक लढाई जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. शिंदेगटाच्या आमदारांनी शिवसेनेच्या नेत्यांवर आरोप केल्यानंतर आता शिवसेनेच्या नेत्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर शाब्दिक हल्ला करत असल्याचं दिसून येत आहे. त्यातच आता जळगांव जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांनी थेट शिंदेंवर निशाणा साधला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

ज्यांना प्रसाद ओक आणि आनंद दिघे यांच्यातला फरक ओळखता येत नाही, ते आपल्याला आज हिंदुत्वाचे धडे देत आहेत, काकांची पुण्याई आणि शिवसेनेच्या विचारांचा आधार घेऊन आज जे पुढं आले ते आज एकनाथ शिंदेंना बाप म्हणत आहेत, आमच्या पाचोरा मतदारसंघात खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरी निवडणूक लढवली तरी त्यांना पाडून ठाकरेंशी एकनिष्ठ असणारा शिवसैनिकच विजयी होईल, असा दावा शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगावातील पाचोरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवावी, त्यात ते जर विजयी झाले तर मी बापाचं नाव लावणार नसल्याचाही दावा शिवसेना नेते सावंत यांनी केला आहे. पाचोरा शहरात आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात सावंत बोलत होते. यात शिवसेना नेत्यांनी शिंदेगटाचे आमदार किशोर पाटलांवर जोरदार टीका केली आहे.

मेळाव्यात बोलताना सावंत म्हणाले की, जे सोडून गेले ते कावळे आणि जे ठाकरेंशी एकनिष्ठ राहून शिवसेनेत सोबत आहेत ते शिवरायांचे खरे मावळे आहेत, हिम्मत असेल तर सद्यस्थितीत निवडणुका घेण्यात याव्यात, बंडखोर आमदारांपैकी एक जरी आमदार निवडून आला तरी मी राजकारण सोडून देईल, आगामी काळात बंडखोर आमदारांना जनता जागा दाखवेल असंही सावंत यांनी सांगितलं आहे.

शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या आमदारांवर ठाकरेंनी विश्वास ठेवला त्याच आमदारांनी ठाकरेंच्या पाठित खंजीर खुपसला, आणि या बंडखोर लोकांच्या रॅलीत लोक आणण्यासाठी लोकांना प्रती तीनशे रुपये द्यावे लागल्याचाही आरोप शिवसेना नेते सावंत यांनी केला आहे.

पुढील बातम्या