मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  'एकनाथ शिंदेंनी मला फोन करून...', शिवसेनेच्या निष्ठावंत आमदाराचा मोठा गौप्यस्फोट

'एकनाथ शिंदेंनी मला फोन करून...', शिवसेनेच्या निष्ठावंत आमदाराचा मोठा गौप्यस्फोट

Jul 21, 2022, 09:45 AM IST

    • CM Eknath Shinde : 'तुम्ही मला जी मदत केली ती काही व्यक्तिगत केलेली नाही, पक्ष म्हणून केली, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे होते', म्हणून मदत केल्याचं ठाकरेंशी एकनिष्ठ असलेल्या शिवसेना आमदारानं सांगितलं आहे.
Shiv Sena leader and Maharashtra chief minister Eknath Shinde (HT)

CM Eknath Shinde : 'तुम्ही मला जी मदत केली ती काही व्यक्तिगत केलेली नाही, पक्ष म्हणून केली, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे होते', म्हणून मदत केल्याचं ठाकरेंशी एकनिष्ठ असलेल्या शिवसेना आमदारानं सांगितलं आहे.

    • CM Eknath Shinde : 'तुम्ही मला जी मदत केली ती काही व्यक्तिगत केलेली नाही, पक्ष म्हणून केली, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे होते', म्हणून मदत केल्याचं ठाकरेंशी एकनिष्ठ असलेल्या शिवसेना आमदारानं सांगितलं आहे.

Shiv Sena MLC Ambadas Danve : शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड करत भाजपबरोबर सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळं आता शिवसेनेतील १२ खासदारांसह अनेक नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा द्यायला सुरुवात केली आहे. मुंबई उपनगरासह कोंकण आणि मराठवाड्यातील अनेक स्थानिक शिवसेना नेत्यांनी शिंदेगटाला पाठिंबा दिला आहे. परंतु आता औरंगाबादचे शिवसेना जिल्हाप्रमुख आणि विधानपरिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी शिंदे यांनी फोन करून मोठी ऑफर दिल्याचा दावा केला आहे. त्यामुळं राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pandharpur Darshan : भाविकांसाठी आनंदवार्ता! पंढरपूरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन ‘या’ तारखेपासून पुन्हा होणार सुरू

mahadev betting app : महादेव बुक बेटींग ॲपमधून नारायणगावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल; गैरकारभारासाठी पैसा वळवला परदेशात

Pune Urulikanchan news : वीज कडाडल्याच्या आवाजाने पुण्यात तीन महिला पडल्या बेशुद्ध! एकीचा मृत्यू

Malad Woman Found Dead: मालाडमध्ये राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह

औरंगाबाद जिल्ह्यातील सहापैकी पाच आमदारांनी शिंदेगटाला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळं जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळं शिवसेनेनं काल शहरात आयोजित केलेल्या मेळाव्यात आमदार दानवे यांनी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या समोर मोठा गौप्यस्फोट केला आहे. 'जेव्हा एकनाथ शिंदे यांनी पक्षातून बंडखोरी केली तेव्हा त्यांनी मलाही फोन करून ऑफर दिली होती, परंतु मी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक असल्याचं सांगत ती ऑफर' नाकारल्याचा दावा आमदार दानवे यांनी केला आहे.

याशिवाय शिंदे यांनी फोन करून मदत केली असल्याचं सांगितलं होतं. त्याला उत्तर देताना तुम्ही मला जी मदत केली ती काही व्यक्तिगत केलेली नाही, पक्ष म्हणून केली, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे होते', म्हणून तुम्ही मदत केल्याचा दावाही शिवसेना आमदार दानवे यांनी केला आहे.

जिल्ह्यातील ज्या आमदारांनी शिवसेनेतून बंडखोरी केली आहे, त्यांना शिवसैनिकांनी निवडून आणलं आहे, त्यामुळं त्यांना निवडून आणण्यासाठी आपण काय केलं आहे, हे सांगा, असं आवाहनही दानवे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. आपल्याला कुठल्याही गद्दार आमदाराची आठवण येणार नाही, इतके लोक आपल्यासोबत आहेत, कोणत्याही आमदारानं केलेली मदत ही वैयक्तिक नसून त्यांनी ती शिवसेनेत असल्यामुळं केलेली आहे, बाकी काही नाही, असाही टोला दानवे यांनी जिल्ह्यातील बंडखोर आमदारांना लगावला आहे.

पुढील बातम्या