मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bhiwandi Fire : भिवंडीत अग्नितांडव ! केमिकलच्या ड्रमने भरलेल्या ट्रकला भीषण आग, लाखोंचे नुकसान

Bhiwandi Fire : भिवंडीत अग्नितांडव ! केमिकलच्या ड्रमने भरलेल्या ट्रकला भीषण आग, लाखोंचे नुकसान

Mar 11, 2023, 10:49 AM IST

    • Bhiwandi Fire : भिवंडी येथील दापोडे गावाच्या हद्दीत मध्यरात्री केमिकलच्या ड्रमने भरलेल्या ट्रकला भीषण आग लागली. तब्बल ५ तासांच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
भिवंडीत अग्नितांडव

Bhiwandi Fire : भिवंडी येथील दापोडे गावाच्या हद्दीत मध्यरात्री केमिकलच्या ड्रमने भरलेल्या ट्रकला भीषण आग लागली. तब्बल ५ तासांच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

    • Bhiwandi Fire : भिवंडी येथील दापोडे गावाच्या हद्दीत मध्यरात्री केमिकलच्या ड्रमने भरलेल्या ट्रकला भीषण आग लागली. तब्बल ५ तासांच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

भिवंडी : भिवंडीत मध्यरात्री एका केमिकलच्या ड्रमने भरलेल्या ट्रकला अचानक मोठी आग लागली. ही आग एवढी भयंकर होती की, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तब्बल ५ तास लागले. मिळालेल्या माहितीनुसार या ट्रकमधील एका ट्रकच्या ड्रममध्ये अचानक स्फोट झाला. अन काहणी क्षणात ट्रकने पेट घेतला. सुदैवाने ही बाब चालकाच्या लक्षात आल्याने त्यांनी प्रसंगावधान राखून ट्रकमाडून उडी मारल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, केमिकल ट्रक असल्यामुळे गावात दहशतीचे वातावरण होते.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai dry day 2024: ‘या’ तीन दिवशी दारू विक्रीवर बंदी! मुंबईतील सर्व वाईन शॉप, बीअर बार राहणार बंद

Gondia : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी; शिक्षक आणि मुख्याध्यापकांमधील वाद सोडवायला गेलेल्या लिपिकाचा मृत्यू

Ghatkopar Hoarding Collapse : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला राजस्थानमधून अटक

मुंबईतील बोरिवली इथं २१ मे पासून वसंत व्याख्यानमाला; अभ्यासकांसाठी बौद्धिक मेजवानी

हा ट्रक भिवंडी येथील दापोडे गावातून जात होता. यावेळी ट्रकमध्ये असलेल्या केमिकलच्या ड्रममध्ये अचानक मोठा स्फोट झाला. पाहता पाहता ट्रकने पेट घेतला. ट्रकमध्ये असलेल्या केमिकलमुळे काही वेळातच आगीने उग्र रूप धारण केले. दरम्यान, स्फोटामुळे पेटलेले काही ड्रम हे चायनीजच्या दुकानात पडले. यामुळे या दुकानाचे मोठे नुकसान झाले. आग लागल्यामुळं ट्रकमध्ये केमिकल ड्रमच्या स्फोट होत होते. स्फोटामुळं हे ड्रम हवेत उडून परिसरात कोसळत होते. या मुळे परिसरात दहशतीचे वातावरण होते.

या घटनेची माहिती मिळताच नारपोली पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले. भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल होत त्यांनी आग विझवण्याच्या कामाला सुरुवात केली. दरम्यान, आग मोठी असल्याने तिच्यावर नियंत्रण मिळवण्यात अडचणी येत होत्या. तब्बल पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आलं आहे. दरम्यान, आग कशामुळे लागली ही अद्याप समजू शकले नाही.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या