मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Fire Incident : पैठणच्या बिडकीनमध्ये गोडाऊनला भीषण आग, मदत व बचावकार्य जारी
Bidkin Chatrapati Sambhajinagar Fire Incident
Bidkin Chatrapati Sambhajinagar Fire Incident (HT)

Fire Incident : पैठणच्या बिडकीनमध्ये गोडाऊनला भीषण आग, मदत व बचावकार्य जारी

10 March 2023, 23:35 ISTAtik Sikandar Shaikh

Bidkin Fire Incident : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीनमधील एका गोडाऊनला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Bidkin Chatrapati Sambhajinagar Fire Incident : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन शहरातील एका गोडाऊनमध्ये भीषण लागल्याची घटना समोर आली आहे. रात्री नऊ वाजेच्या सुमारास शेकटा रोडवरील गोडाऊनला आग लागली असून त्यानंतर आता अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्यानंतर आता जवानांसह स्थानिकांनी मदत व बचावकार्य सुरू केलं आहे. या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाल्याचं वृत्त अजून समोर आलेलं नाही. आगीत गोडाऊनमधील सर्व साहित्य जळून खाक झालं असून आग विझवण्याचे प्रयत्न जारी असल्याची माहिती आहे. आग कशामुळं लागली हे समजू शकलेलं नाही.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, पैठण तालुक्यातील बिडकीन शहरातील शेकडा रोडलगत असलेल्या एका गोडाऊनला अचानक आग लागली. गोडाऊनमधून धुराचे लोट बाहेर पडत असल्याचं दिसताच स्थानिकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले, त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू केलं आहे. गोडाऊनमध्ये प्लास्टिकच्या वस्तू आणि ड्रम असल्यामुळं आगीनं उग्र रुप धारण केलेलं आहे. खाजगी टँकर आणि अग्निशमन दलाच्या बंबाच्या सहाय्यानं आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या तासाभरापासून आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहे.

शेकटा रोडवरील गोडाऊनमध्ये आग लागल्याची माहिती मिळताच बिडकीन पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली असून रुग्णवाहिकादेखील घटनास्थळी पोहचल्या आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत कुणालाही इजा झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गोडाऊनला आग लागल्याची माहिती मिळताच बिडकीन परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घटनास्थळी गर्दी केली असून नागरिकांनीही आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.