मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Onion Price : तब्बल ४ हजार टन कांदा सडणार! निर्यातशुल्क वाढल्याने कांद्याचे १४० कंटेनर्स जेएनपीटी बंदरात अडकले

Onion Price : तब्बल ४ हजार टन कांदा सडणार! निर्यातशुल्क वाढल्याने कांद्याचे १४० कंटेनर्स जेएनपीटी बंदरात अडकले

Aug 22, 2023, 11:32 AM IST

    • Onion Rates In Maharashtra: कांद्याच्या निर्यातीवर केंद्र सरकारने ४० टक्के निर्यातशुक्ल लावल्याने त्याच्या निर्यातीवर परिमाण झाला असून तब्बल १४० टन जेएनपीटी बंदरावर अडकून पडला आहे. हा कांदा सडण्याच्या मार्गावर असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.
Onion Rates In Maharashtra

Onion Rates In Maharashtra: कांद्याच्या निर्यातीवर केंद्र सरकारने ४० टक्के निर्यातशुक्ल लावल्याने त्याच्या निर्यातीवर परिमाण झाला असून तब्बल १४० टन जेएनपीटी बंदरावर अडकून पडला आहे. हा कांदा सडण्याच्या मार्गावर असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.

    • Onion Rates In Maharashtra: कांद्याच्या निर्यातीवर केंद्र सरकारने ४० टक्के निर्यातशुक्ल लावल्याने त्याच्या निर्यातीवर परिमाण झाला असून तब्बल १४० टन जेएनपीटी बंदरावर अडकून पडला आहे. हा कांदा सडण्याच्या मार्गावर असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.

मुंबई: केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर तब्बल ४० टक्के निर्यात शुल्क लागू केल्याने याचे तीव्र पडसाद राज्यात उमटले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे निर्यातदार अडचणीत आले आहे. वाढलेल्या किमतीमुळे कांदा घेण्यास विदेशी व्यापाऱ्यांनी कांदा घेण्यास नकार दिल्याने मुंबईच्या जेएनपीटी बंदरावर कांद्याचे तब्बल १३० ते १४० कंटेनर अडकून पडले आहेत. हा कांदा जर वेळत निर्यात झाला नाही तर तब्बल ४ हजार टन कांदा सडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Dadar Traffic change: महायुतीच्या सभेसाठी मुंबईतील वाहतुकीत मोठा बदल! जाणून घ्या कोणते रस्ते बंद? पर्यायी मार्ग कोणते ?

Pune : पुणेकरांनो मुंबईला जात असाल तर ही बातमी वाचा! सीएसएमटी प्लॅटफॉर्म विस्तारीकरणामुळे प्रगती, डेक्कन एक्सप्रेस रद्द

Mumbai college bans hijab: मुंबईतील आचार्य मराठे कॉलेजमध्ये हिजाब, बुरख्यावर बंदी कायम, ड्रेसकोडचा नियम 'जैसे थे' राहणार

Railway megablock : महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म विस्तारासाठी १५ दिवसांचा मेगा ब्लॉक

Chandrayaan 3 Landing Time: चांद्रयान ३ च्या लँडिंगमध्ये अडथळा आल्यास प्लॅन बी तयार; अशी आहे इस्रोची योजना

केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातशुल्क वाढवल्याने परदेशात जाणाऱ्या कांद्याच्या किमती वाढल्या आहे. या निर्णयावर शेतकऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. सर्वाधिक कांदा हा राज्यात उत्पादित होत असल्याने याचा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसणार आहे. या निर्णयाच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहे. राज्यातील अनेक नेते आज दिल्लीत जाणार असून हा निर्णय मागे घेण्याची मागणी करणार आहेत.

Vijaykumar Gavit : ऐश्वर्या रायवर भाष्य करणे गावितांना भोवले, महिला आयोगाने धाडली नोटीस; तीन दिवसांत मागितले उत्तर

विदेशात निर्यात होणाऱ्या कांद्याचे तब्बल १३० ते १४० कंटेनर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्र्स्ट (जेएनपीटी) बंदरात उभे आहेत. हा कांदा घेण्यास विदेशी व्यापाऱ्यांनी नकार दिल्याने हा कांदा सडण्याच्या मार्गावर आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे. नाशिकमध्ये सुद्धा निर्यातीचा कांदा पडून आहे. यावर पुढील दोन दिवसांत यावर निर्णय न झाल्यास कंटेनर मधील कांदा सडून व्यापारी, शेतकऱ्यांचे करोडोंचे नुकसान होणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवित नाशिक जिल्ह्यातील १५ बाजार समित्यांनी लिलाव बंद ठेवले आहेत. धुळे जिल्ह्यातही बेमुदत संप पुकारला आहे. नाशिक जिल्ह्यात सुमारे दीड लाख क्विंटल कांद्याची, तर सुमारे २५ ते ३० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली.

भारतातून परदेशात तब्बल अडीच हजार कंटेनरची निर्यात होते. मात्र केंद्र सरकारच्या निर्णयामुळे ही निर्यात खोळंबणार आहे. या निर्णयाविरोधात मुंबई कृषी बाजार उत्पन्न समितीचे व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहे. कांदा निर्णयात झाला नाही तर तो स्थानिक बाजारात विकला जाणार आहे. यामुळे कांद्याचे भाव कोसळणार आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या