मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  सख्ख्या भावानंच केला बहिणीचा बलात्कार; संतापजनक घटनेनं वर्धा हादरलं!

सख्ख्या भावानंच केला बहिणीचा बलात्कार; संतापजनक घटनेनं वर्धा हादरलं!

Jul 25, 2022, 03:18 PM IST

    • Wardha Crime News : सख्ख्या भावानंच बहिणीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना राज्यातील वर्धा जिल्ह्यात घडली आहे.
Wardha Rape Case (HT_PRINT)

Wardha Crime News : सख्ख्या भावानंच बहिणीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना राज्यातील वर्धा जिल्ह्यात घडली आहे.

    • Wardha Crime News : सख्ख्या भावानंच बहिणीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना राज्यातील वर्धा जिल्ह्यात घडली आहे.

Wardha Rape Case : राज्यात सध्या क्राईमच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. पुण्यातील बलात्कार आणि हत्येचं प्रकरण ताजं असतानाच आता विदर्भातील वर्धा जिल्ह्यात सख्ख्या भावानं बहिणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. भावानं केलेल्या बलात्कारात पिडित बहिण गरोदर राहिल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी अल्पवयीन असल्यानं ही घटना आणि केस आणखी गंभीर झाली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pandharpur Darshan : भाविकांसाठी आनंदवार्ता! पंढरपूरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन ‘या’ तारखेपासून पुन्हा होणार सुरू

mahadev betting app : महादेव बुक बेटींग ॲपमधून नारायणगावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल; गैरकारभारासाठी पैसा वळवला परदेशात

Pune Urulikanchan news : वीज कडाडल्याच्या आवाजाने पुण्यात तीन महिला पडल्या बेशुद्ध! एकीचा मृत्यू

Malad Woman Found Dead: मालाडमध्ये राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह

काय आहे नेमकं प्रकरण?

आई-वडीला काही कामानिमित्त घराबाहेर गेलेले असताना सख्ख्या भावानं बहिणीवर जबरदस्तीनं बलात्कार केला, त्यानंतर पिडित मुलगी ही सहा महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर हा सगळा प्रकार पालकांच्या लक्षात आला. पिडीत मुलीची प्रकृती बिघडल्यानं तिला सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी डॉक्टरांनी मुलगी गर्भवती राहिल्याचं सांगताच पालकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यामुळं नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेनं जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

…आणि कुटुंबानं दिली पोलिसांत तक्रार...

मुलीचं पोट दुखत असल्यानं तिला दवाखान्यात नेलं असता ती गर्भवती राहिल्याचं लक्षात आल्यानंतर मुलीच्या पालकांनी याबाबतची तक्रार पोलिसांत दिली. याशिवाय या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी सर्वात आधी पिडित मुलीशी विचारपूस केली, परंतु मुलीनं काहीही सांगण्यास नकार दिला. शेवटी पोलिसांनी हे प्रकरण सखी वन स्टॉप सेंटरकडे सोपवल्यानंतर मुलीनं तिच्या भावानंच तिच्यावर बलात्कार केल्याचं सांगितलं. त्यानंतर पिडित मुलीची साक्षच्या आधारावर वर्धा पोलिसांनी पिडितेच्या भावाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या