मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  वेश बदलून तरुणांची दर्ग्यात तोडफोड; तणाव निर्माण करणाऱ्यांना पोलिसांकडून अटक

वेश बदलून तरुणांची दर्ग्यात तोडफोड; तणाव निर्माण करणाऱ्यांना पोलिसांकडून अटक

Jul 25, 2022, 01:23 PM IST

    • उत्तर भारतात कावड यात्रा सुरू असताना काही समाजकंटक तरुणांनी वातावरण खराब करण्याच्या हेतूनं दर्ग्यात तोडफोड केल्याची धक्कादायक घटना धडली आहे.
UP Crime News (HT)

उत्तर भारतात कावड यात्रा सुरू असताना काही समाजकंटक तरुणांनी वातावरण खराब करण्याच्या हेतूनं दर्ग्यात तोडफोड केल्याची धक्कादायक घटना धडली आहे.

    • उत्तर भारतात कावड यात्रा सुरू असताना काही समाजकंटक तरुणांनी वातावरण खराब करण्याच्या हेतूनं दर्ग्यात तोडफोड केल्याची धक्कादायक घटना धडली आहे.

ऐन कावड यात्रेच्या काळात दर्ग्यात तोडफोड करून समाजात तणाव निर्माण करणाऱ्या दोन समाजकंटकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोन तरुणांनी बिजनौरमधील तीन दर्ग्यांमधील चादर आणि पडदे फाडून त्याला जाळण्याचा प्रयत्न केल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी प्रसंगावधान राखत कमल आणि आदिल या दोन सख्ख्या भावांना बेड्या ठोकल्या आहे. या प्रकरणानंतर घटनास्थळावर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

CRPF Constable recruitment Result : सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरती परीक्षेचा निकाल जाहीर, 'इथं' पाहा तुमचे गुण

viral video : ऑरेंज आइसक्रीम आवडीने खाताय? मग हा व्हिडिओ एकदा बघाच, पुन्हा खायची इच्छा होणार नाही!

Viral Video : पाकिस्तानात असती तर तुझं मी अपहरण केलं असतं! उबर चालकाची कॅनडात महिला प्रवाशाला धमकी

Fact Check : तामिळनाडूमध्ये पंतप्रधान मोदींचा पुतळा जाळताना द्रमुकच्या कार्यकर्त्यांच्याच लुंगीला लागली आग? वाचा सत्य

नेमकं काय झालं?

यूपीच्या बिजनौर जिल्ह्यात दोन टवाळखोर तरुणांनी धार्मिक स्थळांवर गोंधळ धातला होता. बिजनौरमधील वातावरण खराब करण्यासाठी त्यांनी हे कृत्य केल्याची माहिती आहे. आरोपींनी घातलेल्या गोंधळात दर्ग्यातील मजारचं मोठं नुकसान झालं आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी दोघा आरोपींना तातडीनं अटक केली आहे. त्यानंतर जिल्ह्यातील सामाजिक सौहार्द कायम रहावं, यासाठी पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केलेली असली तरी यामागे कुणाचा हात आहे, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन तरुणांनी कपडे बदलून व डोक्यावर भगव्या कलरचा पट्टा बांधून जिल्ह्यातील तीन दर्ग्यात जाऊन तोडफोड केली, राज्यात कावड यात्रा सुरू असतानाच हा प्रकार घडल्यानं वातावरण खराब करण्याचा आरोपींचा हेतू होता, मात्र आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचं बिजनौर पोलिसांनी सांगितलं आहे.

पुढील बातम्या