मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News : ड्रायव्हरचा आगाऊपणा; स्कूल बस टाकली पुरात, वाचा पुढचा थरार

Viral News : ड्रायव्हरचा आगाऊपणा; स्कूल बस टाकली पुरात, वाचा पुढचा थरार

Jul 25, 2022, 11:24 AM IST

    • Flood In Madhya Pradesh : समोरच्या पुलारून पूराचं पाणी वाहत असतानाही स्कूल बस ड्रायव्हरच्या आगाऊपणामुळं २५ शाळकरी मुलांचा जीव धोक्यात आला, परंतु स्थानिकांनी ऐनवेळी मदत केल्यानं मोठा अनर्थ टळला.
Flood In Madhya Pradesh (HT)

Flood In Madhya Pradesh : समोरच्या पुलारून पूराचं पाणी वाहत असतानाही स्कूल बस ड्रायव्हरच्या आगाऊपणामुळं २५ शाळकरी मुलांचा जीव धोक्यात आला, परंतु स्थानिकांनी ऐनवेळी मदत केल्यानं मोठा अनर्थ टळला.

    • Flood In Madhya Pradesh : समोरच्या पुलारून पूराचं पाणी वाहत असतानाही स्कूल बस ड्रायव्हरच्या आगाऊपणामुळं २५ शाळकरी मुलांचा जीव धोक्यात आला, परंतु स्थानिकांनी ऐनवेळी मदत केल्यानं मोठा अनर्थ टळला.

Viral News In Marathi : सध्या पावसाळा सुरू असल्यानं देशभरातील अनेक राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये पावसानं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. शहरांतील वाहतूकीवरही मुसळधार पावसाचा परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे. अनेक लोक वाहनांमध्ये प्रवास करत असताना पूराच्या वेढ्यात सापडून वाहून गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशीच काहीशी घटना मध्यप्रदेशातील शाजापूर जिल्ह्यात घडली आहे. ड्रायव्हरनं आगाऊपणा केल्यामुळं स्कूल बस पूराच्या पाण्यात सापडली आहे. त्यामुळं स्थानिकांनी एकत्र येत ट्रॅक्टरच्या मदतीनं स्कूल बसला पूराच्या पाण्यातून बाहेर काढलं. त्यामुळं मोठी दुर्घटना टळली आहे, कारण या बसमध्ये घटना घडली त्यावेळी २५ शाळकरी मुलं बसलेले होते.

ट्रेंडिंग न्यूज

CRPF Constable recruitment Result : सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरती परीक्षेचा निकाल जाहीर, 'इथं' पाहा तुमचे गुण

viral video : ऑरेंज आइसक्रीम आवडीने खाताय? मग हा व्हिडिओ एकदा बघाच, पुन्हा खायची इच्छा होणार नाही!

Viral Video : पाकिस्तानात असती तर तुझं मी अपहरण केलं असतं! उबर चालकाची कॅनडात महिला प्रवाशाला धमकी

Fact Check : तामिळनाडूमध्ये पंतप्रधान मोदींचा पुतळा जाळताना द्रमुकच्या कार्यकर्त्यांच्याच लुंगीला लागली आग? वाचा सत्य

गेल्या काही दिवसांपासून मध्यप्रदेशातील शाजापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळं जिल्ह्यातील नद्या आणि नाल्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी पूराचं पाणी रस्त्यावर आल्याचं पाहायला मिळालं.

नेमकं काय झालं?

मिळालेल्या माहितीनुसार, शाजापूर जिल्ह्यात आलेल्या पूरामुळं त्याचं पाणी रस्त्यावरून वाहत होतं. त्यावेळी २५ शाळकरी मुलांना घेऊन जाणारी एक स्कूल बस ड्रायव्हरच्या आगाऊपणामुळं पूराच्या पाण्यात अडकली. यात बसचा अर्धा भाग पाण्याखाली गेल्यानं ही बस वाहून जाणार असं अनेकांना वाटत असताना स्थानिकांनी प्रसंगावधान राखत ट्रॅक्टरच्या मदतीनं बसमधील २५ शाळकरी मुलांचा जीव वाचवला.

ड्रायव्हरनं केला आगाऊपणा...

शाजापूरच्या अपेक्स इंटरनेशनल स्कूलमधील २५ मुलांना सोडण्यासाठी बस बिकलांखेडीला जात होती, त्यावेळी पुलावरून पूराचं पाणी वाहत असतानाही आगाऊपणा करत २५ शाळकरी मुलांचा जीव धोक्यात घालत बस पुढे नेली. त्यामुळं हा सगळा प्रकार घडला. त्यामुळं आता काही लोकांनी बस ड्रायव्हरविरुद्ध कारवाई करण्याची मागणी शाळा प्रशासनाकडं केली आहे.

विभाग

पुढील बातम्या