मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ganeshotsav 2023 : मुंबईतील १४ पूल धोकादायक, गणेशमूर्ती नेताना काळजी घ्या; बीएमसीकडून मंडळांना आवाहन

Ganeshotsav 2023 : मुंबईतील १४ पूल धोकादायक, गणेशमूर्ती नेताना काळजी घ्या; बीएमसीकडून मंडळांना आवाहन

Aug 30, 2023, 09:07 AM IST

    • Ganeshotsav 2023 Updates : गणेश मंडळांना एकाच अर्जाद्वारे संपूर्ण परवानग्या दिल्या जाणार आहे. तसेच मंडप आणि अनामत शूल्क माफ करण्यात आला आहे.
Ganeshotsav 2023 Mumbai Maharashtra (HT)

Ganeshotsav 2023 Updates : गणेश मंडळांना एकाच अर्जाद्वारे संपूर्ण परवानग्या दिल्या जाणार आहे. तसेच मंडप आणि अनामत शूल्क माफ करण्यात आला आहे.

    • Ganeshotsav 2023 Updates : गणेश मंडळांना एकाच अर्जाद्वारे संपूर्ण परवानग्या दिल्या जाणार आहे. तसेच मंडप आणि अनामत शूल्क माफ करण्यात आला आहे.

Ganeshotsav 2023 Mumbai Maharashtra : अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. पालिकेकडून सर्व परवानग्या मिळाल्यानंतर अनेक गणेश मंडळांनी महाकाय गणेशमूर्ती मंडपात दाखल करण्यात सुरुवात केली आहे. याशिवाय गणेश मूर्तीचं आगमन आणि विसर्जन सोहळ्याचीही जोरदार तयारी सुरू आहे. त्यातच आता मुंबई महापालिकेने मुंबईतील गणेश मंडळांना शहरातील धोकादायक पूलांवरून गणेश मूर्तीची वाहतूक करताना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. गणरायाचं आगमन आणि विसर्जन करत असताना पुलावर जास्त वेळ न थांबण्याच्या सूचना महापालिकेकडून करण्यात आल्या आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

मुंबईतील अंधेरीत २०१८ साली गोखले पूल कोसळला होता. तसेच सीएसटीतला हिमालय पूल कोसळल्याने अनेकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळं यंदाच्या गणेशोत्सवावेळी शहरातील धोकादायक पुलावरून गणेश मूर्ती नेताना गणेश मंडळांनी जास्त वेळ थांबू नये, तसेच पुलावरून जाताना काळजी घेण्याचं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील तब्बल ३४४ पुलांचं नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं आहे. परंतु अनेक जुने पूल अद्यापही मुंबईत सुरू आहे. त्यामुळं अशा पूलावरून गणेश मूर्तीचं विसर्जन करताना काळजी घेण्याच्या सूचना बीएमसीकडून गणेश मंडळांना करण्यात आल्या आहे.

मुंबईतील धोकादायक पूल कोणते?

मुंबई महापालिकेने गणेश मंडळांना खबरदारीच्या सूचना जारी करताना शहरातील धोकादायक पूलांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये घाटकोपर येथील रेल्वे ओव्हर ब्रीज, करीरोडचा रेल्वे ओव्हर ब्रीज, चिंचपोकळीतला (आर्थर रोड) रेल ओव्हर ब्रीज, भायखळ्यातील रेल ओव्हर ब्रीज, महालक्ष्मी परिसरातील स्टील रेल्वे ओव्हर ब्रीज, प्रभादेवीतला कॅरोल रेल ओव्हर ब्रीज, दादरचा टिळक रेल्वे ओव्हर ब्रीज, मरीन लाईन्सवरील रेल्वे ओव्हर ब्रीज, सँडहर्स्ट रोडवरील रेल्वे ओव्हर ब्रीज, ग्रँटरोड परिसरातील फ्रेंच रेल ओव्हर ब्रीज, केनडी रेल्वे पूल, फॉकलँड रेल्वे ओव्हर ब्रीज आणि मुंबई सेंट्रल जवळील बेलासीस हे पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळं आता गणेश मूर्तीचं आगमन आणि विसर्जन करताना अधिकची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

पुढील बातम्या