मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kharghar Incident : खारघरमधील घटना दुर्दैवी, चौकशीच झालीच पाहिजे, भाजपच्या बड्या नेत्याची मागणी

Kharghar Incident : खारघरमधील घटना दुर्दैवी, चौकशीच झालीच पाहिजे, भाजपच्या बड्या नेत्याची मागणी

Apr 21, 2023, 10:39 PM IST

    • Kharghar Incident : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने १५ लोकांचा मृत्यू झाल्यानंतर आता भाजपकडून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
Kirit Somaiya On Kharghar Incident (HT)

Kharghar Incident : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने १५ लोकांचा मृत्यू झाल्यानंतर आता भाजपकडून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

    • Kharghar Incident : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने १५ लोकांचा मृत्यू झाल्यानंतर आता भाजपकडून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

Kirit Somaiya On Kharghar Incident : महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मुंबईतील खारघर येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने १५ श्रीसदस्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानंतर राज्यात राजकीय वादंग पेटलं आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खारघरमधील दुर्घटनेची हायकोर्टाच्या विद्यमान न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळं आता या प्रकरणावरून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार अडचणीत येण्याची शक्यता असतानाच आता भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी देखील खारघरमधील घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

खारघरमधील घटना दुर्दैवी असून त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. मी खारघरला गेलो होतो. तेथील घटनेची चौकशी कशी झाली पाहिजे?, ही मागणी करण्याचा अधिकार विरोधी पक्षांना आहे. तशी मागणी ते मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांच्याकडे करू शकतात. त्यावर मंत्रिमंडळात योग्य तो निर्णय होईल, परंतु या प्रकरणाची चौकशी व्हायलाच हवी, अशी मागणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील दुर्दैवी घटनेबाबात आम्हाला दु:ख झालेलं आहे. हा प्रकार पुन्हा घडू नये, याची काळजी आता सरकारला घेण्याची गरज आहे. सत्ताधाऱ्यांना कार्यक्रम आयोजित करताना आणखी काळजी घेण्याची गरज असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

Eid-Ul-Fitr 2023 : रमजानच्या अखेरच्या शुक्रवारी देशभरात उत्साह, चंद्रदर्शन झाल्यानंतर उद्या साजरी होणार ईद

महाराष्ट्र शासनातर्फे जेष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडला होता. कार्यक्रम दुपारच्या भरात पार पडल्यामुळे १५ लोकांचा उष्माघातामुळं मृत्यू झाला होता. त्यानंतर आता या प्रकरणावरून शिंदे-फडणवीस सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

पुढील बातम्या