मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Baramati: सुप्रिया सुळे यांच्याकडून बारामतीची आयआयटी, आयआयएमशी तुलना; म्हणाल्या…

Baramati: सुप्रिया सुळे यांच्याकडून बारामतीची आयआयटी, आयआयएमशी तुलना; म्हणाल्या…

Sep 08, 2022, 03:32 PM IST

    • Supriya Sule on Baramati: बारामती लोकसभा मतदारसंघाची जागा जिंकण्याच्या भाजपच्या घोषणेबद्दल बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.
Supriya Sule

Supriya Sule on Baramati: बारामती लोकसभा मतदारसंघाची जागा जिंकण्याच्या भाजपच्या घोषणेबद्दल बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.

    • Supriya Sule on Baramati: बारामती लोकसभा मतदारसंघाची जागा जिंकण्याच्या भाजपच्या घोषणेबद्दल बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर भाजपनं महाराष्ट्रात आता राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व देशातील एक दिग्गज नेते शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीला राजकीय खिंडार पाडण्याचा निर्धार भाजपनं केला आहे. त्यावरून सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. बारामतीच्या सध्याच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर प्रतिक्रिया देताना बारामतीची आयआयटी व आयआयएम या संस्थांशी तुलना केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

त्या पत्रकारांशी बोलत होत्या. भाजपच्या ‘मिशन बारामती’मध्ये मला काही वावगं वाटत नसल्याचं त्या म्हणाल्या. ‘माझा राज्यघटनेवर विश्वास आहे. राज्यघटनेनुसार प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळं कुणी बारामतीला गेलं तर त्यात गैर काय?,’ असा प्रतिप्रश्न त्यांनी केला आहे. 

‘बारामतीबद्दल ते (भाजप) जे काही प्रेम दाखवतायत, त्याचं मी मनापासून स्वागत करते. प्रत्येक माणसाला आयआयटी, आयआयएममध्येच अॅडमिशन का हवी असते? कारण देशातील सगळ्यात चांगल्या व प्रतिष्ठित संस्था म्हणून त्याकडं पाहिलं जातं. तसंच बारामतीचं आहे. बारामती हा देशातील खूप विकसित मतदारसंघ आहे. हे मी आकड्यांच्या आधारे बोलत आहे. अनेक वर्षे आपण सगळं हे पाहतोय. बारामतीच्या जनतेनं कष्ट करून लोकांनी हा मतदारसंघ, तालुका विकसित केलाय. खूप लोकांनी त्यासाठी त्याग केला आहे. त्यामुळं ते हवंसं वाटणं यात काही गैर नाही. प्रत्येकाला चांगलीच गोष्ट हवी असते,’ असा चिमटा सुप्रिया सुळे यांनी भाजपला काढला आहे.

बारामती हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा मतदारसंघ आहे. लोकसभेत त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यांनी राज्यसभेत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुप्रिया सुळे इथून निवडणूक लढवतात. तर, बारामती विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व अजित पवार करतात. हा मतदारसंघ अनेक सोयीसुविधांनी युक्त आहे. अनेक संस्थांचं जाळ मतदारसंघात आहे. पवार कुटुंबीयांचं बारामती मतदारसंघावर पूर्ण वर्चस्व आहे. आजवर अनेक पंतप्रधानांनी व अभ्यासकांनी या मतदारसंघाला भेट दिली आहे. शरद पवार यांच्या राजकारणाला शह देण्यासाठीच भाजपनं आता या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलं आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या