मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bachchu Kadu : ‘आजकाल हिजडे सुद्धा आमदार होतात’, वादग्रस्त वक्तव्यानंतर बच्चू कडूंची माफी

Bachchu Kadu : ‘आजकाल हिजडे सुद्धा आमदार होतात’, वादग्रस्त वक्तव्यानंतर बच्चू कडूंची माफी

Sep 18, 2023, 11:43 AM IST

    • Bachchu Kadu Statement : प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी तृतीयपंथी समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यावरून नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.
Bachchu Kadu Controversial Statement

Bachchu Kadu Statement : प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी तृतीयपंथी समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यावरून नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.

    • Bachchu Kadu Statement : प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी तृतीयपंथी समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यावरून नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.

Bachchu Kadu Controversial Statement : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपद मिळत नसल्याने नाराज असलेल्या प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी वादग्रस्त वक्तव्य करत खळबळ उडवून दिली आहे. एका कार्यक्रमात बोलताना आमदार बच्चू कडू यांनी 'आजकाल हिजडे सुद्धा आमदार होतात', असं वक्तव्य केलं आहे. तसेच चूक लक्षात येताच बच्चू कडू यांनी उपस्थितांची माफी देखील मागितली आहे. परंतु आता बच्चू कडू यांच्या वक्तव्यामुळं राज्यातील तृतीयपंथी समाज आक्रमक होण्याची शक्यता आहे. बच्चू कडू हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने शिंदे-फडणवीस सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

जळगावातील एका कार्यक्रमात बोलताना आमदार बच्चू कडू म्हणाले की, मी पुन्हा आमदार होईल की नाही, मला याची पर्वा नाहीय. शेतकऱ्यांची आणि गोरगरिब जनतेची पर्वा असणारा हा प्रहार पक्ष आहे. आमदारकीचं काय, आज-काल हिजडे सुद्धा आमदार होतात, असं वादग्रस्त वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे. चूक लक्षात येताच त्यांनी आज-काल आंडू पांडूही आमदार होतात असं म्हणायचं होतं, असं सांगत बच्चू कडू यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळं आता यावरून राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. परंतु आता बच्चू कडू यांनी वादग्रस्त वक्तव्याची जाहीर सभेतूनच माफी मागितली आहे.

ज्यांच्या बोलण्यात दम नसतो, ओठावर मिशी नसते, बाई आहे की माणूस हे देखील कळत नाही, असेही लोक सध्याच्या काळात आमदार होताहेत, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे. त्यानंतर बच्चू कडू यांनी वादग्रस्त वक्तव्यावर सारवासारव करत उपस्थितांची माफी देखील मागितली. याशिवाय कॉंग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या रॅलीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यावरून बच्चू कडू यांनी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या