Nashik Car Accident : नाशिकमध्ये भरधाव कारला भीषण अपघात, भाजप नेत्यासह चौघांचा जागीच मृत्यू
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik Car Accident : नाशिकमध्ये भरधाव कारला भीषण अपघात, भाजप नेत्यासह चौघांचा जागीच मृत्यू

Nashik Car Accident : नाशिकमध्ये भरधाव कारला भीषण अपघात, भाजप नेत्यासह चौघांचा जागीच मृत्यू

Published Sep 18, 2023 11:09 AM IST

Car Accident Nashik : नाशिक-चांदवड महामार्गावर भरधाव कारचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Nashik Car Accident News Today (प्रातिनिधिक फोटो)
Nashik Car Accident News Today (प्रातिनिधिक फोटो) (HT)

Nashik Car Accident News Today : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरू असतानाच आता नाशिक जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिक-चांदवड महामार्गावर भरधाव कारला भीषण अपघात झाला असून त्यात धुळे शहरातील भाजपच्या नगरसेवकासह अन्य चार प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. चांदवडच्या नमोकार तीर्थक्षेत्रासमोरील मुंबई-आग्रा महामार्गावर कार आणि कंटेनरमध्ये हा भीषण अपघात झाला आहे. पाचही प्रवाशांचे मृतदेह नजीकच्या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर आता स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील चांदवड नजीकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर भरधाव कार आणि कंटेनरमध्ये आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. त्यामुळं चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एका व्यक्तीला उपचारासाठी नेण्यात येत असताना मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये धुळ्याचे भाजप नगरसेवक किरण आहिरराव यांचाही समावेश असल्याची माहिती आहे. त्यानंतर आता चांदवड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. अपघात झाल्यानंतर मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू असून सोमा टोलवेज कंपनीचे अपघातग्रस्त पथक घटनास्थळी दाखल झालं आहे.

भरधाव कार आणि कंटेनरचा अपघात झाल्यानंतर मुंबई-आग्रा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनांना रस्त्यावरून हटवण्याचं काम हाती घेतलं आहे. अपघातात भाजप नगरसेवकाच्या कारचा चुराडा झाला असून कंटेनरचा समोरच्या भागाचं मोठं नुकसान झालं आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता चांदवड नजीक झालेल्या अपघातात भाजप नेत्याचा मृत्यू झाल्याने राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर