Maharashtra Konkan News: गणेशोत्सवासाठी कोकणात जणाऱ्यांची संख्या मोठी आहे. हा उत्सव एका दिवसांवर येऊन ठेपल्याने रविवारी मोठ्या प्रमाणात मुंबईतून कोकणकर गावी जाण्यासाठी गेले होते. मात्र, रेल्वेच्या ढिसाळ कारभाराचा मोठा फटका त्यांना बसला. रेल्वेच योग्य नियोजन न केल्याने याचा फटका प्रवाशांना बसला. तब्बल ५ ते ६ तास रेल्वे गाड्या उशिरा धावत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. १२ तासांच्या प्रवासाठी तब्बल १८ तास लागले. त्यात गाड्या उशिरा धावत असल्यामुळे स्थानकांवर तोबा गर्दी झाली होती.
कोकण रेल्वेच्या डाऊन मार्गावर गाड्यांचा वेग मोठ्या प्रमाणात मंदावला. यामुळे अनेक गाड्या या उशिरा धावत होत्या. त्यामुळे सर्वच गाड्या या तब्बल ३ ते ४ तास विलंबाने धावत होत्या. मुंबईतील बहुतांश रेल्वे स्थानकावर नागरिकांची झुंबड उडाली होती. हजारोंच्या संख्येने नागरी स्थानकावर जमले होते. त्यात रेल्वेचे नियोजन कोलमडल्याने त्याचाही फटका प्रवाशांना बसला. ठाणे रेल्वे स्थानकावर देखील कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. गर्दीमुळे अनेक प्रवासी हे वेळेवर स्थानकावर पोहचु शकले नाहीत. या वर्षी कोकणात जाण्यासाठी २०० पेक्षा जास्त गाड्या रेल्वेने सोडल्या आहेत. असे असले तरी प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याने सर्व गाड्या क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात भरून जात होत्या. यात अनेक नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करत होते.
मिळालेल्या माहितीनुसार कोकणात जाणाऱ्या सर्व रेल्वे या ५ ते ६ तास उशिरा धावत होत्या. सर्व सुपरफास्ट एक्सप्रेस मिरज मार्गे वळवण्यात न आल्याने तसेच मालगाड्या देखील याच मार्गाने धावत असल्याने १२ तासांचा प्रवास हा १८ तासांचा झाला. दरम्यान, ही समस्या मेगाब्लॉमुळे झाल्याचे रेल्वे प्रवाशाने म्हटले आहे.
कोकणात जणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक संथ झाली होती. तर पुणे शिवाजीनगर आणि स्वारगेट बसस्थानकावर देखील तोबा गर्दी झाली होती.
संबंधित बातम्या