मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shirdi Airport : साईभक्तांसाठी खुशखबर, शिर्डी विमानतळावर उद्यापासून नाईट लँडिंगची व्यवस्था

Shirdi Airport : साईभक्तांसाठी खुशखबर, शिर्डी विमानतळावर उद्यापासून नाईट लँडिंगची व्यवस्था

Apr 07, 2023, 08:47 PM IST

    • Shirdi Airport Night Landing : गेल्या अनेक दिवसांपासून शिर्डीतील विमानतळावर नाईट लँडिंगची व्यवस्था करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात आली होती.
Shirdi Airport Night Landing News Update (HT_PRINT)

Shirdi Airport Night Landing : गेल्या अनेक दिवसांपासून शिर्डीतील विमानतळावर नाईट लँडिंगची व्यवस्था करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात आली होती.

    • Shirdi Airport Night Landing : गेल्या अनेक दिवसांपासून शिर्डीतील विमानतळावर नाईट लँडिंगची व्यवस्था करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात आली होती.

Shirdi Airport Night Landing News Update : साईबाबांच्या शिर्डीला समृद्धी महामार्ग आणि वंदे भारत एक्स्प्रेसशी कनेक्ट केल्यानंतर आता केंद्रातील मोदी सरकारने शिर्डीतील विमानतळावर नाईट लँडिंगची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता महाराष्ट्रासह देशातील अनेक शहरांमधून शिर्डीत काकड आरतीसाठी येणाऱ्या लाखो साईभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. नाईट लँडिंगमुळं शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांच्या संख्येत मोठी वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उद्यापासून म्हणजेच आठ एप्रिलपासून शिर्डीत विमानांचं नाईट लँडिंग होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

maha ssc hsc borad result 2024 : प्रतीक्षा संपली! पुढच्या आठवड्यात जाहीर होणार दहावीचा निकाल, बारावीचा कधी?

Pune Traffic change : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, मेट्रो कामामुळे 'या' प्रमुख मार्गावरील वाहतुकीत आजपासून मोठा बदल

Pune Aircraft : टग ट्रकच्या धडकेत विमानाला पडले भगदाड! पुणे विमानतळावर रोखले उड्डाण; पुणे- दिल्ली विमानाचा अपघात टळला

Mahayuti mumbai rally : महायुतीच्या सभेसाठी मुंबईतील वाहतुकीत मोठा बदल! जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद?

केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयानंतर उद्या इंडिगो कंपनीचं विमान रात्री आठ वाजता शिर्डी विमानतळावर उतरणार आहे. त्यानंतर नाईट लँडिंग करणाऱ्या विमानांची संख्या वाढवण्यात येणार असल्याची माहिती आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येणाऱ्या भाविकांमध्ये हैदराबाद, चेन्नई, दिल्ली आणि बंगळुरू येथील प्रवाशांची संख्या मोठी आहे. परंतु साईबाबा मंदिरात काकड आरतीला उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्राबाहेरील भाविकांना शिर्डीत मुक्काम करावा लागत होता. परंतु आता विमानांच्या नाईट लँडिंगमुळं राज्याबाहेरील प्रवाशांना काकड आरती करत तातडीनं विमानानं परतणं शक्य होणार आहे.

शिर्डीत विमानाची सोय उपलब्ध झाल्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंगची सोय करण्याची मागणी प्रवाशांनी केली होती. त्यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू होता. त्यामुळं आता केंद्राच्या या निर्णयामुळं भाविकांना शिर्डीत पोहोचणं आणि परतणं सुलभ होणार आहे. यापूर्वी शिर्डी विमानतळावरील विमानांच्या धावपट्ट्यांची संख्या वाढवण्यात आली होती. त्यानंतर आता नाईट लँडिंगची व्यवस्था झाल्यामुळं साईभक्तांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या