मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sheetal Mhatre: आदित्य ठाकरे यांना धक्का!शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणी साईनाथ दुर्गे यांना अटक

Sheetal Mhatre: आदित्य ठाकरे यांना धक्का!शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणी साईनाथ दुर्गे यांना अटक

Mar 14, 2023, 09:22 AM IST

  • Sheetal Mhatre Viral Video: शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आदित्य ठाकरे यांचे जवळचे असलेले साईनाथ दुर्गे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

साईनाथ दुर्गे

Sheetal Mhatre Viral Video: शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आदित्य ठाकरे यांचे जवळचे असलेले साईनाथ दुर्गे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

  • Sheetal Mhatre Viral Video: शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आदित्य ठाकरे यांचे जवळचे असलेले साईनाथ दुर्गे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

Sainath Durge arrest : आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओचे राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत दोघांना अटक केली आहे. या सोबतच आदित्य ठाकरे यांचे विश्वासू सहकारी असलेले साईनाथ दुर्गे यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनीच हा व्हिडिओ व्हायरल केला असल्याचा आरोप त्यांचावर ठेवण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

साईनाथ दुर्गे हे युवासेनेचे नेते असून बीएमसीच्या शिक्षण समितीचे माजी सदस्यही आहेत. यासोबतच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या जवळचे आहेत. दुर्गे हे ठाकरे गटाचे सोशल मीडिया प्रमुख देखील आहेत. दहिसर पोलिसांनी त्यांना मुंबई विमानतळावरुन अटक केली आहे. साईनाथ दुर्गे यांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणी आणखी कुणाचा सहभाग आहे याचा पोलिस शोध घेत आहेत. या सोबतच मातोश्री फेसबूक पेज चालवणारे विनायक डावरे आणि रवींद्र चौधरी यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आदित्य ठाकरे यांनी साईनाथ दुर्गे यांच्या पाठीशी उभे राहत साईनाथ दुर्गे हा आमचा वाघ असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणामुळे कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेलं वक्तव्य लपलेलं आहे, भाजपच्या एका सदस्यावर विनयभंगाचे आरोप करण्यात आलेले आहेत, त्यावर कुणाचं लक्ष नाही, तसेच शिंदे गटाच्या एका आमदाराचे गोळीबार प्रकरणही यामुळे लपलं गेल्याच आरोप त्यांनी केला आहे.

 

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर खळबळ उडाली होती. शीतल म्हात्रे यांनी हा व्हिडिओ युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी व्हायरल केल्याच्या आरोप करत उद्धव ठाकरे गटावर अनेक आरोप केले होते.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या