मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sheetal Mhatre Case : शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणाची SIT चौकशी होणार, शिंदे-फडणवीस सरकारची घोषणा

Sheetal Mhatre Case : शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणाची SIT चौकशी होणार, शिंदे-फडणवीस सरकारची घोषणा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 13, 2023 08:12 PM IST

Sheetal Mhatre Video Case : आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर सरकारनं या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Eknath Shinde And Devendra Fadnavis
Eknath Shinde And Devendra Fadnavis (HT_PRINT)

Sheetal Mhatre Viral Video : शिंदे गटाच्या उपनेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक अश्लिल व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ मार्फ करून व्हायरल केला जात असल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. या प्रकरणावरून आज विधानसभेत राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी देखील रंगलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. त्यानंतर आता या प्रकरणाची एसआयटीकडून चौकशी करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारनं घेतला आहे. मंत्री शंभुराजे देसाई यांनी याबाबतची घोषणा विधानसभेत केली आहे. शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आल्याची माहितीही देसाई यांनी सभागृहात दिली आहे.

विधानसभेत बोलताना मंत्री शंभुराजे देसाई म्हणाले की, ठाकरे गटाचा सोशल मीडियाचा राज्य समन्वयक विनायक डावरे यानं शीतल म्हात्रेंचा व्हिडिओ मातोश्री या फेसबुक पेजवरून शेयर केलेला आहे. याशिवाय इतर आरोपींकडून हा व्हिडिओ व्हॉटस्अॅप ग्रुप्समार्फत मोठ्या प्रमाणात शेयर करण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांकडून चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मोबाईल्स आणि सीमकार्ड जप्त करण्यात आल्याची माहिती देसाई यांनी विधानसभेत दिली. याशिवाय या प्रकरणातील तपास एसआयटीकडून केला जाणार असून आरोपींवर कडक कारवाई केली जाणार असल्याचं मंत्री शंभुराजे देसाई यांनी स्पष्ट केलं आहे.

सिनियर आयपीएस अधिकाऱ्यांकडून होणार तपास...

शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास राज्यातील सिनियर आयपीएस अधिकाऱ्यांकडून केला जाणार असल्याचंही देसाई यांनी म्हटलं आहे. विधानसभेत आज शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणावरून वातावरण तापलेलं होतं. माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून सुत्रधाराला अटक करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारनं या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.

IPL_Entry_Point