मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pimpri Crime News : लव्ह, सेक्स अन् धोका, पिंपरीतील तरुणीसोबत धक्कादायक प्रकार

Pimpri Crime News : लव्ह, सेक्स अन् धोका, पिंपरीतील तरुणीसोबत धक्कादायक प्रकार

May 29, 2023, 02:16 PM IST

  • Pimpri Crime News : लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्यास नकार दिल्यामुळं आरोपीने तरुणीचे अश्लिल व्हिडिओ व्हायरल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Pimpri Chinchwad Crime News Marathi (HT_PRINT)

Pimpri Crime News : लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्यास नकार दिल्यामुळं आरोपीने तरुणीचे अश्लिल व्हिडिओ व्हायरल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Pimpri Crime News : लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्यास नकार दिल्यामुळं आरोपीने तरुणीचे अश्लिल व्हिडिओ व्हायरल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Pimpri Chinchwad Crime News Marathi : नागपुरात महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता पुण्यातील पिंपरीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्यास नकार देणाऱ्या तरुणीचे अश्लिल व्हिडिओ प्रियकराने सोशल मीडियावर व्हायरल केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर धक्कादायक घटनेचा पर्दापाश झाला आहे. त्यानंतर आता पोलिसांनी आरोपी रोहित कांतीलाल भोसले याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे. फिर्यादी तरुणी आणि आरोपी तरुणामध्ये प्रेमसंबंध होते, त्यानंतर झालेल्या वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Porsche Car Case : पुण्यातील घटनेबाबत राहुल गांधीनी पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केला संताप; म्हणाले...

Gondia Accident : दारूच्या नशेनं घेतला आणखी एक बळी, गोंदियात कपडे धूत असलेल्या महिलेला ट्रॅक्टरनं चिरडलं

Pune Porsche Accident : पोर्शे कार अपघातातील मृत जोडप्यावर अंत्यसंस्कार, तरुणाच्या भावाचे पोलिसांवर गंभीर आरोप

Pune car accident : पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासन हलले! 'त्या' दोन पब्सना टाळे ठोकण्याचे आदेश

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही गेल्या काही दिवसांपासून दिघी येथे राहणारा आरोपी रोहित भोसले यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्यामुळं आरोपी रोहित सातत्याने तरुणीला लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याची मागणी करत होता. त्याला तरुणीने नकार देत घरीच राहण्याचा निर्णय घेतला. त्यावरून संतापलेल्या आरोपी रोहितने प्रेयसी तरुणीचे अश्लिल फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले. याशिवाय तरुणीच्या बहिणीलाही प्रेयसीचे अश्लिल व्हिडिओ व्हायरल केले. त्यानंतर तरुणीने आरोपी रोहितला या प्रकरणाचा जाब विचारला असता त्याने तरुणीला शिवागीळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

अश्लिल व्हिडिओ व्हायरल झाल्याचं समजताच तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात आरोपी रोहित भोसले याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिासांनी आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे. फिर्यादी तरुणीचे व्हिडिओ व्हायरल करून आरोपी फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच पिंपरीत एका तरुणीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना समोर आली होती, त्यानंतर आता आरोपी प्रियकरानेच गर्लफ्रेंडचे अश्लिल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याची घटना समोर आल्यामुळं पिंपरी चिंचवड शहरात खळबळ उडाली आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या