मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mahalunge Pune : जिगरी मित्रानंच केली तरुणाची दगडानं ठेचून हत्या; धक्कादायक घटनेनं पुणे हादरलं

Mahalunge Pune : जिगरी मित्रानंच केली तरुणाची दगडानं ठेचून हत्या; धक्कादायक घटनेनं पुणे हादरलं

Jan 22, 2023, 04:37 PM IST

    • Mahalunge Crime News : हॉटेलमध्ये चायनीज खात असताना झालेल्या वादातून आरोपी विठ्ठलनं आपल्याच मित्राच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Mahalunge Pune Crime News (HT_PRINT)

Mahalunge Crime News : हॉटेलमध्ये चायनीज खात असताना झालेल्या वादातून आरोपी विठ्ठलनं आपल्याच मित्राच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

    • Mahalunge Crime News : हॉटेलमध्ये चायनीज खात असताना झालेल्या वादातून आरोपी विठ्ठलनं आपल्याच मित्राच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Mahalunge Pune Crime News : पुण्यातील अनेक भागांमध्ये कोयता गँगनं धुडगूस घातलेला असतानाच आता शहरातील महाळूंगेत जिगरी मित्रानंच किरकोळ वादातून तरुणाची हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. त्यामुळं शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणात तातडीनं कारवाई करत केवळ चार तासांच्या आत आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. परंतु आता आधी कोयता गँगची दहशत आणि त्यानंतर हत्येच्या घटनेमुळं पुण्यातील कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दीपक काशिनाथ राठोड असं मृत तरुणाचं तर विठ्ठल मंगेश चव्हाण असं आरोपीचं नाव आहे.

ट्रेंडिंग न्यूज

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील महाळूंगेत आरोपी विठ्ठल आणि त्याचा मित्र दीपक हे एकाच रुमवर राहत होते. संध्याकाळी मद्यप्राशन केल्यानंतर दोघांनी एकाच हॉटेलमध्ये एकत्र बसून चायनीजवर ताव मारला. परंतु जेवण करत असताना दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. दोघांमध्ये शिवीगाळ झाल्यानंतर संतापलेल्या विठ्ठलने दीपकच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. दीपकचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचं समजताच आरोपी विठ्ठलनं घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर परिसरात मर्डर झाल्याची माहिती महाळूंगेत वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत प्रकरणाची चौकशी सुरू केली.

घटनेनंतर चार तासांत आरोपीला अटक...

महाळूंगेत हत्येची घटना समोर आल्यानंतर स्थानिक पोलिसांनी प्रकरणातील आरोपीचा कसून शोध घेण्यास सुरुवात केली. शहरातून बाहेर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला पोलिसांना सापळा रचून अटक केली आहे. त्यानंतर आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली असून त्यानंतर कोर्टानं आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या