मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  samruddhi mahamarg accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; लक्झरी बसची ट्रकला धडक, १६ प्रवासी गंभीर जखमी

samruddhi mahamarg accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; लक्झरी बसची ट्रकला धडक, १६ प्रवासी गंभीर जखमी

Feb 02, 2024, 10:45 AM IST

    • samruddhi mahamarg accident : समृद्धी मार्गावर वाशिम येथे मध्यरात्री लक्झरी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात १६ प्रवासी जखमी झाले आहेत.
samruddhi mahamarg accident

samruddhi mahamarg accident : समृद्धी मार्गावर वाशिम येथे मध्यरात्री लक्झरी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात १६ प्रवासी जखमी झाले आहेत.

    • samruddhi mahamarg accident : समृद्धी मार्गावर वाशिम येथे मध्यरात्री लक्झरी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात १६ प्रवासी जखमी झाले आहेत.

mahamarg accident : समृद्धी मार्गावरील अपघाताची मालिका सुरूच आहे. गुरुवारी रात्री २ च्या सुमारास या मार्गावर भीषण अपघात झाला. भरधाव वेगात जाणाऱ्या एका लक्झरी बसने समोर असणाऱ्या ट्रकला पाठीमागून जोरदर धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की यात लक्झरी बसच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला तर १६ प्रवासी यात गंभीर जखमी झाले. ही घटना वाशिम जवळ घडली.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Porsche Car Case : पुण्यातील घटनेबाबत राहुल गांधीनी पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केला संताप; म्हणाले...

Pune Porsche Accident : पोर्शे कार अपघातातील मृत जोडप्यावर अंत्यसंस्कार, तरुणाच्या भावाचे पोलिसांवर गंभीर आरोप

Pune car accident : पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासन हलले! 'त्या' दोन पब्सना टाळे ठोकण्याचे आदेश

Pune Car Accident : पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना पुणे पोलिस आयुक्तांचे खुले चॅलेंज! म्हणाले….

helmet compulsion in pune: पुण्यात आता हेल्मेट सक्ती! पदभार घेताच नवीन आयुक्तांनी दिला 'हा' इशारा

समृद्धी महामार्ग हा सध्या अपघाताचा मार्ग म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. या मार्गावरील आपघतांचे प्रमाण वाढले आहे. गुरुवारी रात्री देखील या मार्गावर भीषण अपघात झाला आहे. वाशिम जवळील कारंजा दोनद मार्गावर हा अपघात झाला आहे. एक लक्झरी बस ही भरधाव वेगात या मार्गाने जात होती. यावेळी समोर असणाऱ्या ट्रकपुढे नीलगाय आल्याने ट्रक चालकाने अचानक ब्रेक दाबला.

worli bandra sea link : वरळी-वांद्रे सीलिंकमध्ये दुचाकी घालून महिलेचा धुडगूस; पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळली दुर्घटना

यावेळी पाठीमागून येणाऱ्या बसने या ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की यात बसच्या पुढचा भागाचा चक्काचूर झाला. तर बस मधील १६ प्रवासी हे गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झालेली नाही. ही बस नागपूरवरून पुण्याला जात असतांना हा अपघात झाला. या बसमध्ये जवळपास ३५ ते ४० प्रवासी प्रवास करत होते.

अपघाताची माहिती समजताच स्थानिक नागरिक घटनास्थळी आले. त्यांनी जखमी नागरिकांना बाहेर काढले. दरम्यान, पोलिस देखील घटनास्थळी आले. सर्व जखमींना कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

या पूर्वी देखील या मार्गावर अनेक अपघात झाले आहे. दोन बसची धडक झाल्याने तब्बल १७ प्रवाशांच्या जळून मृत्यू झाला होता. दरम्यान, या मार्गावर वाढत्या अपघातामुळे या मार्गाची पाहणी करून सुरक्षा उपाय योजना करण्यात आल्या.

पुढील बातम्या