मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Pune express way: मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर गॅन्ट्री बसवण्यातही आज २ तासांचा मेगाब्लॉक; 'या' वेळेत वाहतूक बंद

Mumbai Pune express way: मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर गॅन्ट्री बसवण्यातही आज २ तासांचा मेगाब्लॉक; 'या' वेळेत वाहतूक बंद

Jan 11, 2024, 05:14 AM IST

    • Mumbai Pune express way block update : मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत गँट्री उभारण्याचे काम सुरू आहे. यामुळे आज दुपारी १.३० ते ३.३० या वेळेत या मार्गावर वाहतूक ब्लॉक घेतला जाणार आहे.
Mumbai Pune express way

Mumbai Pune express way block update : मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत गँट्री उभारण्याचे काम सुरू आहे. यामुळे आज दुपारी १.३० ते ३.३० या वेळेत या मार्गावर वाहतूक ब्लॉक घेतला जाणार आहे.

    • Mumbai Pune express way block update : मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत गँट्री उभारण्याचे काम सुरू आहे. यामुळे आज दुपारी १.३० ते ३.३० या वेळेत या मार्गावर वाहतूक ब्लॉक घेतला जाणार आहे.

Mumbai Pune express way block today: मुंबई पुणे एक्सप्रेसवे ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. आज गुरुवारी जर तुम्ही एक्सप्रेस वे ने प्रवास करणार असाल तर ही बातमी वाचा. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज (दि ११) दुपारी १.३० ते ३.३० दरम्यान वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात सर्व प्रकारची वाहतूक ही बंद ठेवण्यात आली असून ती पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. या बाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळने (एमएसआरडीसी)माहिती दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Maharashtra Heat Stroke Cases: महाराष्ट्रात ७४ दिवसांत २४१ जण उष्माघाताचे बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्युची नोंद

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Prakash Ambedkar : "खरा निकाल लागलाच नाही, तरी...", प्रकाश आंबेडकरांचे उद्धव ठाकरेंना आवाहन

यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत मुंबई वाहिनीवर कि.मी ९.८०० (पनवेल एक्झिट) आणि कि.मी २९.४०० (खालापूर टोल प्लाझा व मडप बोगद्यादरम्यान) येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत ११ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १.३० वा ते दुपारी ३.३० या वेळेत करण्यात येणार आहे.

या कालावधीत मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारच्या हलकी तसेच जड-अवजड वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद राहील. वाहनाधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल. पुण्याहुन मुंबईकडे जाणारी हलकी वाहने व बसेस ही खोपोली एक्झिट कि.मी ३९.८०० येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुना पुणे मुंबई महामार्ग वरून खोपोली शहरातून पुढे शेडुंग टोलनाका मार्गे मुंबई वाहिनीवर मार्गस्थ होतील.

Uddhav Thackeray : ‘देशातली लोकशाही संपलीय, आता सुप्रीम कोर्ट हीच आशा आहे, शेवटपर्यंत लढणार’

तसेच पुण्याहुन मुंबईकडे जाणारी हलकी व जड अवजड वाहने ही खालापूर टोल नाका येथील डाव्या बाजूकडील शेवटची लेन खालापूर एक्झिट येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुना पुणे मुंबई महामार्गावरून खालापूर शहरातून पुढे शेडुंग टोलनाका मार्गे मुंबई वाहिनीवर मार्गस्थ होतील, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळविले आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर दररोज लाखोंच्या संख्येने वाहनं ये-जा करत असतात. परंतु दुपारी १.३० ते ३.३० दरम्यान, या महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याने वाहनचालकांना मनस्ताप होणार आहे. या मार्गावर अपघात आणि अपघाताची संख्या कमी करण्यासाठी इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे.  

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या