विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिला. त्यांनी कोणत्याही आमदाराला अपात्र न ठरवता खरी शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचा निर्वाळा दिला आहे. त्याचबरोबर शिवसेनेची २०१८ ची घटना ग्राह्य धरत येत नसल्याचे म्हटले आहे. विधानसभा अध्यक्षांच्या या निकालावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबडेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल काहीही लागला असला, तरी या प्रवृत्तीविषयी आपण मिळून लढू, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंना केलं आहे. विधीमंडळात खरा निकाल लागलाच नसून आमचे मित्र उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करत असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उरलेली औपचारिकता आज पूर्ण झाली असल्याचे आंबेडकर यांनी म्हटले.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालावर प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये प्रकाश आंबेडकर म्हणाले, राहुल नार्वेकरांनी जो निकाल दिला, त्याच्यामुळे युतीमधील आमचे मित्रपक्ष उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे. अपेक्षा होती की, खरा निकाल लागेल मात्र, खरा निकाल लागला नाही. उद्धव ठाकरे यांच्याप्रती आम्ही सहानुभूती व्यक्त करतो. ज्या दिवशी निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत नाव आणि चिन्ह कायम ठेवण्याची परवानगी दिली, त्याच दिवशी शिवसेना (UBT) यांची हार झाली होती. आज फक्त औपचारिकता बाकी होती. आम्हाला उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
शिवसेना उपनेत्या सुष्मा अंधारे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर प्रतिक्रिया दिली. सुषमा अंधारे म्हणाल्या की, "तुम्ही जिंकलात म्हणजे आम्ही हरलो असं होत नाही, डाव तुमच्या हातात दिला तरी जिंकता तुम्हाला येत नाही" , असा टोला त्यांनी आपल्या पोस्टमधून लगावला आहे.
संबंधित बातम्या