मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Pune express way: मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर आज २ तासांचा मेगाब्लॉक; 'या' वेळेत वाहतूक बंद

Mumbai Pune express way: मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर आज २ तासांचा मेगाब्लॉक; 'या' वेळेत वाहतूक बंद

Jan 23, 2024, 06:06 AM IST

    • Mumbai Pune express way block update : मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत गँट्री उभारण्याचे काम सुरू आहे. यामुळे आज दुपारी १२ ते २ या वेळेत या मार्गावर वाहतूक ब्लॉक घेतला जाणार आहे.
Mumbai Pune express way

Mumbai Pune express way block update : मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत गँट्री उभारण्याचे काम सुरू आहे. यामुळे आज दुपारी १२ ते २ या वेळेत या मार्गावर वाहतूक ब्लॉक घेतला जाणार आहे.

    • Mumbai Pune express way block update : मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत गँट्री उभारण्याचे काम सुरू आहे. यामुळे आज दुपारी १२ ते २ या वेळेत या मार्गावर वाहतूक ब्लॉक घेतला जाणार आहे.

Mumbai Pune express way block today: मुंबई पुणे एक्सप्रेसवे ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. आज मंगळवारी जर तुम्ही एक्सप्रेस वे ने प्रवास करणार असाल तर ही बातमी वाचा. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज (दि २३) दुपारी १२ ते २ दरम्यान वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात सर्व प्रकारची वाहतूक ही बंद ठेवण्यात आली असून ती पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. या बाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळने (एमएसआरडीसी)माहिती दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Maratha Reservation : मराठा आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षण मोहिमेला उद्यापासून सुरूवात, यंत्रणा सज्ज

यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत मंगळवारी दुपारी १२ ते दुपारी २ वाजेदरम्यान हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत मुंबई वाहिनीवर कि.मी २४.२५० व पुणे वाहिनीवर कि.मी ५६.९०० (कुसगाव वाडी ) येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम करण्यात येणार असल्याने या कालावधीत वाहतूक वळविण्यात आली आहे.

या कालावधीत मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारच्या हलकी तसेच जड-अवजड वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद राहील. वाहनाधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल.

प्रभू श्रीरामासाठी गुजरातच्या कुटुंबाने अर्पण केला ६ किलोचा सोने-हिरेजडित मुकुट, किंमत ऐकून व्हाल थक्क

पुण्याहुन मुंबईकडे जाणारी हलकी वाहने मुंबई वाहिनीवर लेन कि.मी ५५.००० वरून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुना पुणे मुंबई महामार्गावरून मार्गस्थ होतील.

पुण्याहुन मुंबईकडे जाणारी हलकी वाहने व बसेस खोपोली एक्झिट कि .मी ३९.८०० येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुना पुणे मुंबई महामार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडुंग टोलनाका मार्गे मुंबई वाहिनीवर मार्गस्थ होतील.

पुण्याहुन मुंबईकडे जाणारी हलकी व जड -अवजड वाहने ही खालापूर टोल नाका, शेवटच्या लेनने खालापूर एक्झिट कि.मी ३२.५०० येथून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडुंग टोलनाका मार्गे मुंबई वाहिनीवर मार्गस्थ होतील.

मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ या मार्गावरून पुणे बाजुकडून मुंबई बाजूकडे येणारी वाहने शेडुंग फाट्यावरून सरळ पनवेल दिशेने मार्गस्थ होतील.

मुंबईहून पुण्याकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने किलोमीटर ५४.९०० येथील कुसगाव टोल नाका येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुना पुणे मुंबई महामार्गावरून पुणे बाजूकडे वळविण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे कळविण्यात आले आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर दररोज लाखोंच्या संख्येने वाहनं ये-जा करत असतात. परंतु गेली काही दिवसांपासूंन या मार्गावर सातत्याने या कामासाठी मेगा ब्लॉक घेतला जात आहे. यामुले वाहनचालकांना मनस्ताप होत आहे. या मार्गावर अपघात आणि अपघाताची संख्या कमी करण्यासाठी इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या