अयोध्येच्या इतिहास२२ जानेवारीचा दिवस ऐतिहासिक राहिला. राम जन्मभूमीवर निर्माण करण्यात आलेल्या भव्य राम मंदिरात भगवान रामलल्ला विधीवत पद्धतीने विराजमान झाले आहेत. अयोध्येत राम जन्मभूमीवर बनवण्यात आलेल्या प्रभू श्रीरामाच्या मंदिरासाठी सूरत (गुजरात)च्या हिरे व्यापाऱ्याने ११ कोटी रुपये किंमतीचा एक मुकुट दान केला आहे. मुकुट दान करण्यासाठी डायमंड व्यापारी आपल्या कुटूंबासह अयोध्येतील राम मंदिरात पोहोचले होते.
सूरतमधील डायमंड व्यापारी मुकेश पटेल यांनी आपल्या ग्रीनलॅब डायमंड कंपनीत रामलल्लासाठी सोने, हिरे आणि नीलम जडित ६ किलो वजनाचा मुकुट तयार केला होता. याची किंमत ११ कोटी सांगितली जात आहे.
मुकुट दान करण्यासाठी डायमंड व्यापारी मुकेश पटेल कुटूंबासोबत प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या एक दिवस आधी अयोध्येत पोहोचले होते. त्यानंतर २२ जानेवारी रोजी त्यांनी राम जन्मभूमि तीर्थ ट्रस्टला हा मुकूट अर्पण केला.
माहिती विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष दिनेश भाई नावडिया यांनी सांगितले की, गुजरातचे मुकेश पटेल ग्रीन लॅब डायमंड कंपनीचे मालक आहेत. त्यांनी प्रभू रामासाठी काही दागिने अर्पण करण्याचा विचार केला होता. श्रीरामासाठी काय अर्पण करावे याचा निर्णय घेण्यासाठी त्यांनी कुटूंबातील सदस्यांशी व कंपनीतील अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी दागिन्यांनी जडलेला मुकुट रामचरणी अर्पण करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी प्रभू रामलल्लाच्या मूर्तीसाठी मुकुटाचे मोजमाप करण्यासाठी कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांना अयोध्येला पाठवण्यात आले होते.
मूर्तीचे मोजमाप घेऊन कंपनीचे कर्मचारी सुरतला आले. यानंतर मुकुट बनवण्याचे काम सुरू करण्यात आले. ६ किलो वजनाच्या या मुकुटात ४ किलो सोने वापरण्यात आले आहे. यानंतर हिरे, माणिक, मोती, नीलम अशा लहान-मोठ्या आकारांची रत्ने जडवण्यात आली आहेत.
संबंधित बातम्या