मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Aurangabad Fire News : औरंगाबादमध्ये अग्नितांडव सुरूच; वाळूज परिसरातील 'चटई कंपनी'ला भीषण आग

Aurangabad Fire News : औरंगाबादमध्ये अग्नितांडव सुरूच; वाळूज परिसरातील 'चटई कंपनी'ला भीषण आग

Jan 16, 2023, 01:22 PM IST

    • Aurangabad Fire News: औरंगाबाद येथील कपडा मार्केट लाइन येथील दुकानांना आग लागल्याची घटना ताजी असतांनाच आता पुन्हा एका कंपनीला आग लागली आहे. वाळूज महानगर परिसरातील औद्योगिक वसाहतीत असलेल्या 'चटई कंपनी'ला ही भीषण आग लागली आहे.
Aurangabad Fire News

Aurangabad Fire News: औरंगाबाद येथील कपडा मार्केट लाइन येथील दुकानांना आग लागल्याची घटना ताजी असतांनाच आता पुन्हा एका कंपनीला आग लागली आहे. वाळूज महानगर परिसरातील औद्योगिक वसाहतीत असलेल्या 'चटई कंपनी'ला ही भीषण आग लागली आहे.

    • Aurangabad Fire News: औरंगाबाद येथील कपडा मार्केट लाइन येथील दुकानांना आग लागल्याची घटना ताजी असतांनाच आता पुन्हा एका कंपनीला आग लागली आहे. वाळूज महानगर परिसरातील औद्योगिक वसाहतीत असलेल्या 'चटई कंपनी'ला ही भीषण आग लागली आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात रविवारी दुपारच्या सुमारास शहागंज कपडा मार्केटमध्ये भीषण आग लागली होती. ही घटना ताजी असतांना आता सोमवारी १२ च्या सुमारास वाळूज महानगर परिसरातील औद्योगिक वसाहतीत असलेल्या 'चटाई कंपनी'ला भीषण आग लागली आहे. ही आग नेमकी कशी लागली यांची माहिती अद्याप मिळू शकली नाही.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Water Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा; गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी आणि विलेपार्ले भागांतील पाणीकपातीचा निर्णय रद्द

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

वाळूज महानगर परिसरातील औद्योगिक वसाहतीत 'चटाई कंपनी' आहे. या कंपनीला १२ च्या सुमारास अचानक आग लागली. ही आग एवढी मोठी होती की दुरून आगीचे लोट दिसत होते. या घटनेत कंपनीतील लाखो रुपयांच्या मालाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळताच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बंब घटणस्थली पोहचले आहेत. आगीवर नियंत्रन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

चटाई कंपनीच्या आजूबाजूला कंपन्या असल्याने त्या ठिकाणी आग पासरण्याच्या धोका व्यक्त केला जात आहे. ही आग कशामुळे लागली याची माहिती मिळू शकली नाही. कंपनी सुरू असतांना ही आग लागली. दरम्यान, यावेळी कंपनीत काही कामगार देखील होते. या कामगारांना बाहेर काढण्यात आले आहे.सुदैवाने जीवितहानी झाली नाही. आगीने उग्र रूप धारण केल्याने परिसरातील टँकर आणि अग्निशामक दलाचे बंब मागवण्यात आले आहेत.

जोगेश्वरी  औदयोगीक क्षेत्र सोहेल प्लास्टीक कंपनी चटई कारखान्याला आग लागली आहे. या कंपनीत चटई बनवण्याचे काम सुरू होते. 

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या