मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Wrap Recipe: टेस्टीच नाही तर हेल्दी सुद्धा आहे पालक ओट्स रॅप, ब्रेकफास्टसाठी बेस्ट ऑप्शन

Wrap Recipe: टेस्टीच नाही तर हेल्दी सुद्धा आहे पालक ओट्स रॅप, ब्रेकफास्टसाठी बेस्ट ऑप्शन

Dec 04, 2022, 08:53 AM IST

    • Breakfast Recipe: हे ब्रेकफास्ट ऑप्शन तुम्हाला निरोगी ठेवेल आणि तुमचे वेट लॉस गोल पूर्ण करण्यात मदत करेल. चला तर मग जाणून घेऊया पालक ओट्स रॅप कसा बनवायची रेसिपी.
पालक ओट्स रॅप

Breakfast Recipe: हे ब्रेकफास्ट ऑप्शन तुम्हाला निरोगी ठेवेल आणि तुमचे वेट लॉस गोल पूर्ण करण्यात मदत करेल. चला तर मग जाणून घेऊया पालक ओट्स रॅप कसा बनवायची रेसिपी.

    • Breakfast Recipe: हे ब्रेकफास्ट ऑप्शन तुम्हाला निरोगी ठेवेल आणि तुमचे वेट लॉस गोल पूर्ण करण्यात मदत करेल. चला तर मग जाणून घेऊया पालक ओट्स रॅप कसा बनवायची रेसिपी.

Spinach Oats Wrap for Breakfast: सकाळचा नाश्ता हेल्दी असण्यासोबतच टेस्टी असेल तर संपूर्ण दिवस चांगला जातो. अशा परिस्थितीत तुमचा नवीन दिवस निरोगी पद्धतीने सुरू करण्यासाठी तुम्ही तुमच्या ब्रेकफास्ट मेनूमध्ये पालक ओट्स रॅपचा समावेश करू शकता. ओट्स आणि पालक मिसळून हा नाश्ता बनवला जातो. हा नाश्त्याचा पर्याय तुम्हाला निरोगी ठेवेल आणि तुमचे वजन कमी करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात मदत करेल. चला तर मग वाट कसली पाहताय, जाणून घेऊया पालक ओट्स रॅप कसा बनवायचा.

ट्रेंडिंग न्यूज

PCOS Problem: मासिक पाळी नियमित आल्यानंतरही असून शकते पीसीओसची समस्या! जाणून घ्या काय आहेत लक्षणं

joke of the day : तू अजून लग्न का केलं नाहीस, असं जेव्हा कोकिळा कावळ्याला विचारते…

Mango Lassi Recipe: उन्हाळ्याच्या दिवसांत ट्राय करा ७ प्रकारची मँगो लस्सी! मूडही फ्रेश होईल अन् शरीर थंड राहील!

International Museum Day 2024: का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन? जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि थीम

पालक ओट्स रॅप बनवण्यासाठी साहित्य

- ग्लूटेन फ्री ओट्स - २ कप

- बदामाचे दूध - २ कप

- चिरलेला पालक - १ कप

- काळी मिरी पावडर - १ चिमूटभर (ऐच्छिक)

- मीठ - १ चिमूटभर (ऐच्छिक)

 

पालक ओट्स रॅप बनवण्याची पद्धत

पालक ओट्स रॅप बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात ओट्स आणि बदामाचे दूध घालून १ तास भिजत ठेवा. १ तासानंतर हे मिश्रण बाहेर काढा आणि त्याची स्मूथ पेस्ट बनवा. शेवटी पेस्टमध्ये चिरलेला पालक घाला आणि ही पेस्ट पुन्हा बारीक करा. नॉन-स्टिक पॅन मध्यम आचेवर गरम करा. आता या पॅनमध्ये चीला बनवण्यासाठी आवश्यक प्रमाणात पेस्ट घालून तयार केलेली पेस्ट पसरवा. दोन्ही बाजूंनी चांगले गोल्डन होईपर्यंत शिजवा. यानंतर एका प्लेटमध्ये काढून रॅप करा. तुमचे ग्लुटेन फ्री पालक ओट्स रॅप तयार आहेत.

 

विभाग

पुढील बातम्या