मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Dhokla Recipe : ब्रेकफास्टसाठी २० मिनीटात बनवा इंस्टंट ढोकळा

Dhokla Recipe : ब्रेकफास्टसाठी २० मिनीटात बनवा इंस्टंट ढोकळा

Nov 14, 2022, 07:54 AM IST

    • Breakfast Recipe : ढोकळा खायला तुम्हाला सुद्धा आवडत असेल तर अगदी २० मिनीटात बनवा हा ढोकळा आणि ब्रेकफास्ट होईल टेस्टी.
ढोकळा

Breakfast Recipe : ढोकळा खायला तुम्हाला सुद्धा आवडत असेल तर अगदी २० मिनीटात बनवा हा ढोकळा आणि ब्रेकफास्ट होईल टेस्टी.

    • Breakfast Recipe : ढोकळा खायला तुम्हाला सुद्धा आवडत असेल तर अगदी २० मिनीटात बनवा हा ढोकळा आणि ब्रेकफास्ट होईल टेस्टी.

Instant Dhokla Recipe : जर तुम्हाला इंस्टंट ढोकळा बनवायचा असेल तर त्यासाठी काही गोष्टींची गरज आहे. आज आम्ही तुम्हाला अशी एक रेसिपी सांगत आहोत ज्याद्वारे ढोकळा पटकन तयार होतो. यासाठी फक्त बेसन, दही, इनो या गोष्टींची गरज आहे. नाश्त्यासाठी कोणताही पदार्थ बनवायचा असेल तर झटपट ढोकळा हा उत्तम पर्याय आहे. चला ते कसे बनवायचे ते जाणून घेऊया.

ट्रेंडिंग न्यूज

Fitness Mantra: तुमचे वजन जास्त असेल तर करा हे पायांचे व्यायाम, सोपे होईल वेट लॉस

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

Tamarind Benefits: केवळ जीभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायी आहेत चिंच! ‘असा’ करा वापर

इंस्टंट ढोकळा बनवण्यासाठी आवश्यक साहित्य

- बेसन

- दही

- इनो

- मीठ

- साखर

- मोहरी

- कढीपत्ता

- तेल

इंस्टंट ढोकळा बनवण्याची पद्धत

झटपट ढोकळा बनवण्यासाठी एका बाउल मध्ये बेसन घ्या त्यात दही घालून फेटून घ्या. नंतर त्यात एक चमचा साखर आणि अर्धा चमचा मीठ घाला. प्रमाणानुसार मीठ आणि साखर घाला. यानंतर त्यात एक चमचा इनो टाका. इनो घातल्यावर नीट मिक्स करा. आता केकच्या साच्यात किंवा खोल गोल भांड्यात तेल टाका आणि त्यात ढोकळ्याचे घट्ट मिश्रण घाला. स्टीमरमध्ये ठेवा. जर तुमच्याकडे स्टीमर नसेल तर मोठ्या भांड्यात पाणी टाका आणि त्यात एक वाटी उलटी ठेवा. आता त्यात मिश्रणाचे भांडे ठेवा. १५-२० मिनीट वाफ येऊ द्या. चमच्याने तपासा, चमच्यात मिश्रण लागले नाही तर समजा ढोकळा तयार आहे. आता कढईत तेल टाका. त्यात मोहरी, कढीपत्ता घाला. आता त्यात एक ग्लास पाणी घाला. अर्धा चमचा साखर आणि मीठ घालून ढोकळ्यावर टाका. तुमचा ढोकळा तयार आहे.

 

विभाग

पुढील बातम्या