मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Winter Special Ladoo: बेसनाचे नाही तर बनवा फणसाचे लाडू, खूप सोपी आणि यूनिक आहे ही रेसिपी

Winter Special Ladoo: बेसनाचे नाही तर बनवा फणसाचे लाडू, खूप सोपी आणि यूनिक आहे ही रेसिपी

Jan 23, 2023, 09:38 PM IST

    • हिवाळ्यात महिला विविध प्रकारचे लाडू बनवतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. यातील एक यूनिक प्रकार म्हणजे फणसाचे लाडू. पहा याची सोपी रेसिपी.
फणसाचे लाडू

हिवाळ्यात महिला विविध प्रकारचे लाडू बनवतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. यातील एक यूनिक प्रकार म्हणजे फणसाचे लाडू. पहा याची सोपी रेसिपी.

    • हिवाळ्यात महिला विविध प्रकारचे लाडू बनवतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. यातील एक यूनिक प्रकार म्हणजे फणसाचे लाडू. पहा याची सोपी रेसिपी.

Jackfruit Ladoo Recipe: हिवाळा सुरू झाला की, घरातील महिला कुटुंबातील सदस्यांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे लाडू बनवतात. तुम्हीही बेसन, कणिक आणि बुंदीचे लाडू अनेकदा चाखले असतील. पण आज आम्ही तुमच्यासोबत जी लाडूची रेसिपी शेअर करणार आहे ती थोडी वेगळी आहे. या अनोख्या रेसिपीचे नाव आहे फणसाचे लाडू. हे लाडू फक्त खायला फक्त टेस्टी नाही तर आरोग्यासाठीही अनेक प्रकारे फायदेशीर मानले जातात. मधुमेही रुग्णही हे लाडू खाऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया फणसाचे लाडू कसे बनवले जातात आणि त्यांचे काय फायदे आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Fitness Mantra: तुमचे वजन जास्त असेल तर करा हे पायांचे व्यायाम, सोपे होईल वेट लॉस

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

Tamarind Benefits: केवळ जीभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायी आहेत चिंच! ‘असा’ करा वापर

फणसाचे लाडू बनवण्यासाठी साहित्य

- फणसाचे पीठ - ३ कप

- बदाम - ३ कप

- ऑलिव्ह ऑईल - १/२ कप

- आले पावडर - २ टेस्पून

- काळी मिरी - १ टीस्पून

- वेलची पावडर - १ टीस्पून

- स्वीटनर - २ कप

- डिंक - १ कप

- तूप - १ टीस्पून

फणसाचे लाडू बनवण्याची पद्धत

फणसाचे लाडू बनवण्यासाठी प्रथम कढई गरम करून त्यात फणसाचे पीठ टाकून ते सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. यानंतर त्यात ऑलिव्ह ऑईल, आले पावडर, काळी मिरी, वेलची पावडर, डिंक घालून मिक्स करा. आता या पीठात बदाम आणि स्वीटनर घालून चांगले मिक्स करून लाडू बनवा. तुमचे चविष्ट आणि हेल्दी जॅकफ्रूट लाडू तयार आहेत.

ब्लड शुगरमध्ये फणस खाण्याचे फायदे

तज्ज्ञांच्या मते फणसात ग्लायसेमिक इंडेक्स चांगल्या प्रमाणात आढळतो. कच्चा फणस खाल्ल्याने मधुमेहाच्या रुग्णांना फायदा होतो. याच्या नियमित सेवनाने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. इतकंच नाही तर लठ्ठपणाचा त्रास असलेले लोकही फणसाच्या सेवनाने हा त्रास कमी करू शकतात. जॅकफ्रूटमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असल्याचे आढळून येते. पण कच्चा फणस खाल्ल्यानंतर तुमची शुगर लेव्हल तपासत राहा. तुमच्या आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

विभाग

पुढील बातम्या