मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Ginger Chutney: आल्याच्या चटणीने वाढवा लंच आणि डिनरची चव, नोट करा ही साउथ इंडियन रेसिपी

Ginger Chutney: आल्याच्या चटणीने वाढवा लंच आणि डिनरची चव, नोट करा ही साउथ इंडियन रेसिपी

Jan 22, 2023, 09:51 PM IST

    • रोजच्या जेवणात लोणची आणि चटण्या स्वादिष्ट लागतात. काही वेगळं खायचं असेल तर दक्षिण भारतीय पद्धतीची आल्याची चटणी ट्राय करा.
आल्याची चटणी

रोजच्या जेवणात लोणची आणि चटण्या स्वादिष्ट लागतात. काही वेगळं खायचं असेल तर दक्षिण भारतीय पद्धतीची आल्याची चटणी ट्राय करा.

    • रोजच्या जेवणात लोणची आणि चटण्या स्वादिष्ट लागतात. काही वेगळं खायचं असेल तर दक्षिण भारतीय पद्धतीची आल्याची चटणी ट्राय करा.

South Indian Style Ginger Chutney Recipe: रोजच्या जेवणात गरम मिरची आणि मसाले फार कमी लोकांना आवडतात. पण चवीसाठी लोणची, चटणी किंवा रायता सोबत खाल्ले जातात. तुम्हीही हंगामी भाज्यांची चटणी खात असाल तर यावेळी दक्षिण भारतीय पद्धतीची आल्याची चटणी करून पहा. आल्याची ही चटणी बोरिंग जेवणही चविष्ट बनवेल. तसेच ते बनवून दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये ठेवता येते. चला तर मग जाणून घेऊया साऊथ इंडियन स्टाइल जिंजर चटणी कशी बनवायची.

ट्रेंडिंग न्यूज

International Museum Day 2024: का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन? जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि थीम

Egg Kofta Curry: अंडा कोफ्ता करी सोबत बनवा वीकेंड खास, बनवायला खूप सोपी आहे रेसिपी

Beauty Trend: तांदूळ आणि त्याच्या पाण्यापासून बनवलेले हे फेस पॅक होत आहे व्हायरल, तुम्ही ट्राय केले का?

World Hypertension Day 2024: ही आहेत हायपरटेन्शनची सुरुवातीची लक्षणं, व्यवस्थापित करण्यासाठी फॉलो करा या टिप्स

दक्षिण भारतीय पद्धतीची आल्याची चटणी बनवण्यासाठी साहित्य

- आल्याचे तुकडे एक इंच आकाराचे- सुमारे दोन चमचे

- १० ते १५ लाल मिरच्या

- १ चमचा हरभरा डाळ

- १ चमचा उडीद डाळ

- १ चमचा गूळ पावडर

- १ चमचा चिंचेचा कोळ

- अर्धा टीस्पून मोहरीचे दाणे

- एक चिमूटभर हिंग

- १ टीस्पून संपूर्ण धणे

- १ टीस्पून जिरे

- ५-६ कढीपत्ता

- १ टीस्पून मेथी दाणे

आल्याची चटणी बनवण्याची पद्धत

सर्वप्रथम आले सोलून नीट धुवून घ्या. नंतर त्यांचे एक इंच लांब तुकडे करा. कढईत तेल गरम करून त्यात हे तुकडे शिजवून घ्या. पॅनमधून आले काढून घ्या. उडीद व चणाडाळ कोरडी भाजून घ्यावी. तसेच जिरे, मेथी आणि लाल मिरच्या कोरड्या भाजून घ्या. आल्याचे तुकडे डाळ आणि मसाल्यांसोबत मिक्सरच्या भांड्यात बारीक करा. तसेच गूळ आणि चिंचेची पेस्ट घाला. मीठ घालून बारीक वाटून घ्या.

तडका

दक्षिण भारतीय चटणीमध्ये तडका वेगळा लावला जातो. कढईत तेल गरम करून त्यात कढीपत्ता घाला. तसेच उडीद आणि हरभरा डाळ, मोहरी, हिंग आणि लाल मिरच्या घालून तडका तयार करा. बारीक केलेल्या चटणीवर टाका आणि पसरवा. तुमची टेस्टी आल्याची चटणी तयार आहे. तुम्ही ती लंच पासून तर डिनरपर्यंत कधीही खाऊ शकता.

 

पुढील बातम्या