मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chicken Curry Recipe: वीकेंड बनवा खास बोनलेस चिकन करी सोबत, प्रत्येक जण विचारेल रेसिपी

Chicken Curry Recipe: वीकेंड बनवा खास बोनलेस चिकन करी सोबत, प्रत्येक जण विचारेल रेसिपी

Apr 27, 2024, 12:12 PM IST

    • Weekend Special Recipe: वीकेंडला नॉनव्हेज बनवण्याचा विचार करत असाल तर यावेळी बोनलेस चिकन करीची ही रेसिपी ट्राय करा. ही करी खूप टेस्टी आणि बनवायला सोपी आहे. जाणून घ्या रेसिपी.
Chicken Curry Recipe: वीकेंड बनवा खास बोनलेस चिकन करी सोबत, प्रत्येक जण विचारेल रेसिपी (unsplash)

Weekend Special Recipe: वीकेंडला नॉनव्हेज बनवण्याचा विचार करत असाल तर यावेळी बोनलेस चिकन करीची ही रेसिपी ट्राय करा. ही करी खूप टेस्टी आणि बनवायला सोपी आहे. जाणून घ्या रेसिपी.

    • Weekend Special Recipe: वीकेंडला नॉनव्हेज बनवण्याचा विचार करत असाल तर यावेळी बोनलेस चिकन करीची ही रेसिपी ट्राय करा. ही करी खूप टेस्टी आणि बनवायला सोपी आहे. जाणून घ्या रेसिपी.

Boneless Chicken Curry Recipe: जर तुम्हाला नॉनव्हेज आवडत असेल आणि वीकेंडला काही खास बनवायचे असेल तर ही चिकन रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. बोनलेस चिकन करी रेसिपी केवळ टेस्टीच नाही तर बनवायलाही खूप सोपी आहे. तुम्ही ही रेसिपी दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणासाठी रोटी, नान किंवा भातासोबत सर्व्ह करू शकता. या रेसिपीची विशेषता म्हणजे तुम्ही तुमच्या घरच्या पार्टी फूड मेनूमध्ये सुद्धा याचा समावेश करू शकता. बोनलेस चिकन करी खाल्ल्यानंतर प्रत्येक जण तुम्हाला याची रेसिपी विचारतील. चला तर मग वाट कसली पाहताय वीकेंड आणखी खास बनवण्यासाठी जाणून घ्या बोनलेस चिकन करीची रेसिपी.

ट्रेंडिंग न्यूज

Pakora Recipe: क्रिस्पी लच्छा पकोडे बनवण्याची सोपी रेसिपी, संध्याकाळच्या चहाची मजा होईल डबल

Fitness Mantra: तुमचे वजन जास्त असेल तर करा हे पायांचे व्यायाम, सोपे होईल वेट लॉस

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

बोनलेस चिकन करी बनवण्यासाठी साहित्य

चिकन मॅरीनेट करण्यासाठी

- ५०० ग्रॅम चिकन १ इंच तुकडे

- १/२ टीस्पून हळद

- १ टीस्पून मीठ

- २ चमचे काश्मिरी लाल तिखट

- २ टेबलस्पून लिंबाचा रस

चिकन करीसाठी

- ५ चमचे मोहरीचे तेल

- २ तमालपत्र

- २ इंच दालचिनीचा तुकडा

- ५-६ काळी मिरी

- ५-६ लवंगा

- २-३ कोरड्या लाल मिरच्या

- २ कप बारीक कापलेले कांदे

- १/२ कप बारीक चिरलेला टोमॅटो

- २ चमचे आले लसूण पेस्ट

- ३-४ हिरव्या मिरच्या (अर्ध्या कापलेल्या)

- २ चमचे चिरलेली कोथिंबीर

- १/२ कप साधे दही

- २ चमचे धणे पावडर

- १/२ टीस्पून गरम मसाला

- १/२ टीस्पून जिरे पावडर

- १ कप पाणी

बोनलेस चिकन करी बनवण्याची पद्धत

बोनलेस चिकन करी बनवण्यासाठी आधी चिकन मॅरीनेट करा. यासाठी एका मोठ्या भांड्यात चिकन, हळद, मीठ, लाल तिखट आणि लिंबाचा रस घालून सर्व नीट मिक्स करा. आता भांडे झाकून ३० मिनिटे बाजूला ठेवा. चिकन करी बनवण्यासाठी प्रथम मध्यम आचेवर प्रेशर कुकर ठेवा आणि त्यात तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात तमालपत्र, दालचिनी, काळी मिरी, लवंगा आणि लाल मिरची घालून ४-५ सेकंद परतून घ्या. यानंतर कांदा टाकून तो हलका तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या. ते अधूनमधून ढवळत राहा. आता कुकरमध्ये आले-लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची टाका. कांदा चांगला तपकिरी होईपर्यंत म्हणजे साधारण ७ ते ८ मिनिटे परतून घ्या. यानंतर कुकरमध्ये धने पावडर, गरम मसाला आणि जिरेपूड घालून २० ते ३० सेकंद परतून घ्या.

आता कुकरमध्ये प्री-मॅरिनेट केलेले चिकन घालून आणखी ५ मिनिटे परतून घ्या. आता त्यात टोमॅटो आणि दही घालून अधूनमधून ढवळत राहा आणि आणखी ५ मिनिटे शिजवा. आता कुकरमध्ये पाणी घाला आणि सर्व नीट मिक्स करा. कुकरचे झाकण बंद करा आणि २ शिट्ट्या होईपर्यंत चिकनला मंद आचेवर शिजवा. २ शिट्ट्या झाल्यावर चिकन गॅसवरून उतरवा. कुकरचा प्रेशर स्वतःच सुटू द्या. तुमचे बोनलेस चिकन करी तयार आहे. रोटी, नान किंवा भातासोबत गरमागरम सर्व्ह करा.

पुढील बातम्या