मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Tea Recipe: चहामध्ये ‘या’ ५ गोष्टी वाढवेल चव, आरोग्यही राहील चांगले!

Tea Recipe: चहामध्ये ‘या’ ५ गोष्टी वाढवेल चव, आरोग्यही राहील चांगले!

Dec 23, 2022, 03:32 PM IST

    • Healthy Tea: जर तुम्हाला हळदीचा चहा अधिक स्वादिष्ट बनवायचा असेल तर तुम्ही चहामध्ये काही गोष्टी टाकू शकता.
आरोग्यदायी चहाची रेसिपी (Freepik )

Healthy Tea: जर तुम्हाला हळदीचा चहा अधिक स्वादिष्ट बनवायचा असेल तर तुम्ही चहामध्ये काही गोष्टी टाकू शकता.

    • Healthy Tea: जर तुम्हाला हळदीचा चहा अधिक स्वादिष्ट बनवायचा असेल तर तुम्ही चहामध्ये काही गोष्टी टाकू शकता.

Winter Drink: हिवाळ्यात बहुतेक लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने करतात. चहा फक्त चवीलाच चांगला नसतो तर तो आरोग्यदायीही बनवू शकता. यासाठी चहामध्ये रेगुलर साहित्य सोडून बाकी अजून काही गोष्टी मिळसल्यास आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. अशा परिस्थितीत या गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला चहा मध्ये कोणत्या गोष्टी मिसळू शकता हे सांगणार आहोत.

ट्रेंडिंग न्यूज

Dull Skin Care: घाम आणि धुळीमुळे त्वचा निस्तेज झाली का? उपयुक्त ठरेल काकडीचा फेस पॅक

Fitness Mantra: तुमचे वजन जास्त असेल तर करा हे पायांचे व्यायाम, सोपे होईल वेट लॉस

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

चहा करताना या गोष्टी घाला

१) तुम्ही चहा बनवत असाल तर चव वाढवण्यासाठी त्यात केशर टाकू शकता. यामुळे चव तर वाढतेच पण चहाचा सुगंधही दुप्पट होतो.

२) चहा बनवताना तुम्ही दालचिनीचाही वापर करू शकता. याने चहा तर चविष्ट होतोच, पण दालचिनी आरोग्यासाठीही चांगली असते. याच्या सेवनाने शरीरातील अनेक समस्या दूर होतात.

३) तुम्ही तुमच्या चहामध्ये हळद देखील घालू शकता. असे अनेक अँटिऑक्सिडंट गुणधर्म हळदीमध्ये आढळतात जे आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहेत. हळदीच्या वापराने सर्दी-खोकल्याची समस्या दूर होण्यासोबतच शरीराला ऊबही मिळू शकते.

४) तुम्ही तुमच्या चहामध्ये लवंगा घालू शकता. लवंग घातल्याने चव तर द्विगुणित होतेच पण सर्दी, खोकला वगैरे दूर करण्यासाठीही चहा खूप उपयुक्त आहे.

५) हिवाळ्यात तुम्ही तुमच्या चहामध्ये गूळही घालू शकता. गूळ केवळ आरोग्यदायी मानला जात नाही तर त्याची चवही वाढते. हे आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते.

 

विभाग

पुढील बातम्या