मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Summer Drinks: उन्हाळ्यात रेफ्रेशिंग फील देते वेलचीचे सरबत, नोट करा बनवण्याची पद्धत

Summer Drinks: उन्हाळ्यात रेफ्रेशिंग फील देते वेलचीचे सरबत, नोट करा बनवण्याची पद्धत

Apr 18, 2023, 06:44 PM IST

    • Sharbat for Summer: उन्हाळ्यात संध्याकाळी गरम चहाच्या ऐवजी थंडगार सरबत घ्यायला प्रत्येकाला आवडेल. थंडावा देणारे वेगवेगळे सरबत तुम्ही घरी बनवत असालच. तर आज वेलचीचे सरबत एकदा ट्राय करून पहा.
सरबत

Sharbat for Summer: उन्हाळ्यात संध्याकाळी गरम चहाच्या ऐवजी थंडगार सरबत घ्यायला प्रत्येकाला आवडेल. थंडावा देणारे वेगवेगळे सरबत तुम्ही घरी बनवत असालच. तर आज वेलचीचे सरबत एकदा ट्राय करून पहा.

    • Sharbat for Summer: उन्हाळ्यात संध्याकाळी गरम चहाच्या ऐवजी थंडगार सरबत घ्यायला प्रत्येकाला आवडेल. थंडावा देणारे वेगवेगळे सरबत तुम्ही घरी बनवत असालच. तर आज वेलचीचे सरबत एकदा ट्राय करून पहा.

Cardamom or Elaichi Sharbat Recipe: उन्हाळा सुरू झाला की शरीरात थंडावा मिळावा म्हणून वेगवेगळे शेक, ज्यूस पिण्याकडे कल वाढतो. तुम्ही सुद्धा उन्हाळ्यात मँगो शेक, लिंबू सरबत, जलजीरा यासारख्या गोष्टी ट्राय केल्या असतील. पण कधी तुम्ही वेलचीचे सरबत टेस्ट केलं आहे का? वेलची फक्त खायला चागली लागत नाही तर याचे सरबत देखील तेवढेच टेस्टी आणि आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. चला तर मग जाणून घेऊया टेस्टी वेलचीचे सरबतची रेसिपी.

ट्रेंडिंग न्यूज

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

Tamarind Benefits: केवळ जीभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायी आहेत चिंच! ‘असा’ करा वापर

PCOS Problem: मासिक पाळी नियमित आल्यानंतरही असून शकते पीसीओसची समस्या! जाणून घ्या काय आहेत लक्षणं

joke of the day : तू अजून लग्न का केलं नाहीस, असं जेव्हा कोकिळा कावळ्याला विचारते…

Bitter Gourd: लंच मध्ये अशा पद्धतीने बनवा कारल्याची भाजी, सगळे खातील आवडीने

वेलचीचे सरबत बनवण्यासाठी साहित्य

- १ कप वेलची (भिजवलेली)

- १/४ कप गुलाब जल

- १ किलो साखर

- १/२ टीस्पून हिरवा फूड कलर

- १ लिटर पाणी

- १/४ टीस्पून सायट्रिक अॅसिड (ऐच्छिक)

Jamun Sarbat: उन्हाचा प्रभाव कमी करते जामुन शरबत, नोट करा कुणाल कपूरची ही रेसिपी

वेलचीचे सरबत बनवण्याची पद्धत

वेलचीचे सरबत बनवण्यासाठी सर्वप्रथम एक कप वेलची रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी एका कढईत एक लिटर पाणी घ्या आणि त्यात वेलची टाका आणि १५ ते २० मिनिटे शिजवा. नंतर एक मलमलचे कापड किंवा पाडळ कापड घेऊन हे पाणी गाळून घ्या. त्यानंतर पुन्हा गॅसवर कढई ठेवा आणि त्यात हे गाळलेले पाणी टाका. त्यात साखर, गुलाब जल, हिरवा फूड कलर आणि सायट्रिक अॅसिड घालून मंद आचेवर थोडा वेळ शिजवून घ्या. आता हे पाणी थंड करून एका बॉटलमध्ये भरा. हे सिरप तुम्ही दूध किंवा पाण्यात मिसळून पिऊ शकता. उन्हाळ्यात थंडावा आणि रिफ्रेशिंग फील देण्यासाठी हे सरबत बेस्ट ऑप्शन आहे.

विभाग

पुढील बातम्या