मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Summer Face Pack: उन्हाळ्यात चेहऱ्यावर लावा काकडीचा फेस पॅक, चमक पाहून प्रत्येक जण विचारेल सीक्रेट

Summer Face Pack: उन्हाळ्यात चेहऱ्यावर लावा काकडीचा फेस पॅक, चमक पाहून प्रत्येक जण विचारेल सीक्रेट

May 07, 2024, 11:27 AM IST

    • Summer Skin Care Tips: जर उन्हाळ्यात तुमच्या चेहऱ्याची चमक कमी होत असेल तर तुम्ही काही घरगुती मास्क लावून तुमच्या त्वचेची चमक परत आणू शकता. काकडीचा हा फेस पॅक कसा बनवायचा ते पाहा
Summer Face Pack: उन्हाळ्यात चेहऱ्यावर लावा काकडीचा फेस पॅक, चमक पाहून प्रत्येक जण विचारेल सीक्रेट (freepik)

Summer Skin Care Tips: जर उन्हाळ्यात तुमच्या चेहऱ्याची चमक कमी होत असेल तर तुम्ही काही घरगुती मास्क लावून तुमच्या त्वचेची चमक परत आणू शकता. काकडीचा हा फेस पॅक कसा बनवायचा ते पाहा

    • Summer Skin Care Tips: जर उन्हाळ्यात तुमच्या चेहऱ्याची चमक कमी होत असेल तर तुम्ही काही घरगुती मास्क लावून तुमच्या त्वचेची चमक परत आणू शकता. काकडीचा हा फेस पॅक कसा बनवायचा ते पाहा

Cucumber Face Pack for Summer: उन्हाळ्याच्या हंगामात ऊन, धूळ, माती आणि घाम यामुळे त्वचा निर्जीव आणि कोमेजलेली दिसू लागते. त्याचबरोबर या ऋतूमध्ये टॅनिंग आणि सनबर्नच्या समस्याही उद्भवू लागतात. अशा परिस्थितीत त्वचेला थंड ठेवण्यासाठी आणि हायड्रेट ठेवण्यासाठी काकडीचा वापर केला जाऊ शकतो. काकडी त्वचेला आर्द्रता देते. याशिवाय ते सनबर्न बरे करते आणि मुरुमांसारख्या समस्यांना तोंड देण्यास देखील मदत करते. तसेच या फेस पॅकमुळे त्वचा चमकदार होऊ शकते. उन्हाळ्यात त्वचेवर चमक आणण्यासाठी काकडीचा फेस पॅक प्रभावी आहे. तो कसा बनवायचा ते येथे जाणून घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

Pakora Recipe: क्रिस्पी लच्छा पकोडे बनवण्याची सोपी रेसिपी, संध्याकाळच्या चहाची मजा होईल डबल

Fitness Mantra: तुमचे वजन जास्त असेल तर करा हे पायांचे व्यायाम, सोपे होईल वेट लॉस

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

फेस पॅक बनवण्यासाठी काय आवश्यक आहे -

हा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे

- काकडी

- गुलाब जल,

- चंदन पावडर

- बेसन

फेस पॅक कसा बनवायचा

हा फेस पॅक बनवण्यासाठी आधी काकडी नीट धुवा आणि नंतर किसून घ्या. आता किसलेली काकडी एका वाटीत काढा आणि नंतर त्यात गुलाब जल घाला. त्यात बेसन आणि चंदन पावडर टाकून चांगले मिक्स करा. नीट मिक्स केल्यानंतर तुमचा फेस पॅक तयार आहे.

कसा लावायचा फेस पॅक

हा फेस पॅक लावण्यासाठी आधी चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. आणि नंतर हा फेस पॅक लावा. चेहऱ्यावर हा फेस पॅक साधारण १५ ते २० मिनिटे तसाच राहू द्या. नंतर चेहरा पाण्याने धुवा. काकडीपासून बनवलेला हा फेस पॅक त्वचेला रिलॅक्स आणि शांत करतो. गुलाब जल आर्द्रतेसाठी सर्वोत्तम आहे, ज्यामुळे त्वचा फ्रेश आणि हायड्रेटेड वाटते. याशिवाय बेसन हळूहळू त्वचेच्या मृत पेशी काढून टाकते आणि मऊ करते. तर चंदन पावडर त्वचेचा रंग सुधारण्यास आणि काळे डाग काढून टाकण्यास मदत करते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

पुढील बातम्या