Skin Care Routine for Men: उन्हाळ्यात घाम येणे सामान्य आहे. परंतु पुरुषांच्या चेहऱ्यावर जास्त घाम येतो. अशा परिस्थितीत त्वचेची स्थिती खराब होते. त्याच बरोबर त्वचेची योग्य काळजी घेतली नाही तर चेहरा पूर्णपणे निस्तेज दिसू लागतो. उन्हाळ्यात ग्लोइंग स्किन मिळवण्यासाठी आणि त्वचेच्या समस्या दूर ठेवण्यासाठी महिलांना जसे विशेष स्किन केअरची आवश्यकता असते तसेच पुरुषांनी सुद्धा आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी उन्हाळ्यात स्किन केअर रुटीन फॉलो केले पाहिजे. जर पुरूषांना आपल्या चेहऱ्याची काळजी घ्यायची असेल तर त्यांनी स्किन केअरच्या या स्टेप्सकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. जेणेकरून चेहरा चमकदार राहील. उन्हाळ्यात पुरुषांनी त्वचेची काळजी कशी घ्यावी ते जाणून घ्या.
दिवसाची सुरुवात क्लिंजिंगने करा. म्हणजे चेहरा नीट स्वच्छ करा. दिवसातून दोनदा चेहरा स्वच्छ करणे आवश्यक आहे. जेणेकरून चेहऱ्यावर साचलेली धूळ, माती आणि प्रदूषण साफ करता येईल. तुम्ही आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा डीप क्लीन देखील करू शकता. यासोबतच त्वचेवर टोनर लावल्याने पीएच पातळी संतुलित राहते आणि छिद्रही उघडतात. त्यानंतर मॉइश्चरायझिंग करायला विसरू नका.
चेहऱ्याला उन्हापासून वाचवण्यासाठी सनस्क्रीन आवश्यक आहे. अल्ट्रा व्हायोलेट किरणांमुळे त्वचेचे नुकसान वाढते. पिगमेंटेमेंटेशन आणि डार्क स्पॉट्ससह त्वचेची लवचिकता गमावू लागते. त्यामुळे चेहऱ्यावर सनस्क्रीन लावायला विसरू नका.
जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर ग्लो हवा असेल तर योग्य प्रोडक्ट निवडणे महत्त्वाचे आहे. यासाठी आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार योग्य प्रोडक्ट निवडा. मॉइश्चरायझरपासून फेस मास्क, फेस वॉशपर्यंत असे निवडा जे तुमच्या त्वचेला सूट करणारे असेल. चेहऱ्यावर एक्नेची समस्या किंवा सेसेंटिव्ह स्किनसाठी फक्त योग्य प्रोडक्ट वापरा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या