मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Menopause: तिशीनंतर महिलांमध्ये उद्भवणारी रजोनिवृत्ती ही गंभीर समस्या असू शकते! जाणून घ्या सविस्तर

Menopause: तिशीनंतर महिलांमध्ये उद्भवणारी रजोनिवृत्ती ही गंभीर समस्या असू शकते! जाणून घ्या सविस्तर

Apr 10, 2024, 12:37 PM IST

    • Women Health Care: रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज म्हणजे जेव्हा महिलेला १ वर्षापासून मासिक पाळी येत नाही.
Menopause in women after thirties (freepik)

Women Health Care: रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज म्हणजे जेव्हा महिलेला १ वर्षापासून मासिक पाळी येत नाही.

    • Women Health Care: रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज म्हणजे जेव्हा महिलेला १ वर्षापासून मासिक पाळी येत नाही.

Premature and Early Menopause: आज आपण बघतो बदलणाऱ्या लाईफस्टाइल मुळे तरुणींमध्ये विविध आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. कमी वयातच सांधे दुखी, केस पांढरे होणे, केस गळणे आशा विविध समस्या तर आहेतच परंतू सध्या तरुण मुलींमध्ये एक गंभीर समस्या खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते ती म्हणजे रजोनिवृत्ती म्हणजेच मोनोपॉज. मोनोपॉजची कारणे आणि परिणाम अनेक आहेत. याबद्दल सर एचएन रिलायन्स हॉस्पिटलचे प्रसूती आणि स्त्रीरोग, वेल वुमन सेंटरचे संचालक डॉ. आशा दलाल यांच्याकडून सविस्तर जाणून घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

Tamarind Benefits: केवळ जीभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायी आहेत चिंच! ‘असा’ करा वापर

PCOS Problem: मासिक पाळी नियमित आल्यानंतरही असून शकते पीसीओसची समस्या! जाणून घ्या काय आहेत लक्षणं

रजोनिवृत्तीमध्ये काय होतं?

रजोनिवृत्ती म्हणजे जेव्हा तुम्हाला १ वर्षापासून मासिक पाळी येत नाही. भारतात हे साधारणपणे ५० वर्षांच्या महिलांमध्ये आसपास आढळते. रजोनिवृत्तीच्या काळात आपली कॅनोनिक आवश्यकता वाढते, परंतु आपला आहार तसाच राहतो. इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन, हार्मोन्स कमी होतात. एन्ड्रोजेन्स वाढतात, ज्यामुळे वजन थोडे वाढते, जेथे व्यायामाचा अभाव हे अनुवांशिक गतिहीन जीवनशैलीचे कारण असते.

Women Health: महिलांनी हाडांच्या आरोग्याला प्राधान्य देण्याची गरज का आहे? जाणून घ्या!

ज्या स्त्रियांमध्ये चाळीशी आधीच इस्ट्रोजेनच्या कमतरतेची लक्षणे दिसून येतात आशा स्त्रियांनी वेळेआधीच होणारी ओवरियन कमतरता रोखण्यासाठी पाऊल उचलले पाहिजे. हे मासिक पाळी नसणे किंवा फारच कमी कालावधीसाठी मासिक पाळी येणे, किंवा एस्ट्रॅडिओलची कमी पातळी आणि उच्च गोनाडोट्रोपिन हॉर्मोन असणे यामुळे होते. याचा परिणाम लोकसंख्येच्या १ % पर्यंत होऊ शकतो. लक्षणांव्यतिरिक्त त्याचे निदान करण्यासाठी ४ आठवड्यांच्या अंतराने २ S FSH रीडिंग > २५ IU/L करणे आवश्यक आहे.

तपासणी

या सामान्य तपासणीमध्ये क्रोमोझोमचे विश्लेषण, थायरॉईड आणि अंडाशयाच्या विरूद्ध अँटीबॉडी आणि ऑटोसोमलची अनुवांशिक चाचणी यांचा समावेश होतो.अशा स्त्रियांमध्ये गर्भधारणेची फारच कमी शक्यता असते तेव्हा अंडाशयातील अपक्व स्त्रीबीज किंवा ओव्हम म्हणजेच oocyte हे डोनेट करणे हा एक स्थापित पर्याय निवडला जातो. परंतू जर त्यांना गर्भधारणा नको असेल तर गर्भनिरोधक औषधे देता येऊ शकतात. अशा स्त्रियांना हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका जास्त असतो तसेच त्यांच्या हाडांमधील मिनरल्सची घनता कमी होते, तसेच त्याचा मानसिक आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. अशा केसेसमध्ये एस्ट्रोजेनच्या कमतरतेमुळे लघवीचे आजार देखील उद्भवू शकतात जसे की 'जेनिटो युरेनरी सीमटम्स'.

Summer Pregnancy Tips: गरोदर मातांनी काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या टिप्स!

प्रतिबंधात्मक उपाय

स्त्रियांमधील या लक्षणांवर उपचार करण्यासाठी आणि CVS आरोग्य आणि हाडांचे आरोग्य राखण्यासाठी प्राथमिक प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी (HRT) ची शिफारस केली जाते. याचा कुठेही उलट परिणाम होत नाही. आशा वेळेस १७ बी एस्ट्राडीओल, इथिनिल एस्ट्राडीओल किंवा कॉँजुगेटेड इक्वाईन इस्ट्रोजेन बदलण्यासाठी प्रोजेस्टेरॉनसह चक्रीय एकत्रित उपचार दिले पाहिजेत. कधीकधी लोकल इस्ट्रोजेन जेलचीही आवश्यकता असू शकते. किंवा ओरल काँट्रासेप्टीव्ह् देखील वापरले जाऊ शकते.

अशा वेळेस धूम्रपान न करणे, नियमित व्यायाम करणे आणि निरोगी वजन राखणे या गोष्टींनी हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी जोखीम कमी करणे शक्य आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही.)

विभाग

पुढील बातम्या