मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  घरी या ३ पद्धतीने बनवा नॅचरल हेअर कंडिशनर, खूप सॉफ्ट होतील केस

घरी या ३ पद्धतीने बनवा नॅचरल हेअर कंडिशनर, खूप सॉफ्ट होतील केस

Oct 11, 2022, 06:09 PM IST

    • Homemade Natural Hair Conditioner : हेअर केअरमध्ये कंडिशनरचा रोल महत्त्वाचा आहे. तुम्ही हे घरी देखील बनू शकता.
होममेड नॅचरल हेअर कंडिशनर

Homemade Natural Hair Conditioner : हेअर केअरमध्ये कंडिशनरचा रोल महत्त्वाचा आहे. तुम्ही हे घरी देखील बनू शकता.

    • Homemade Natural Hair Conditioner : हेअर केअरमध्ये कंडिशनरचा रोल महत्त्वाचा आहे. तुम्ही हे घरी देखील बनू शकता.

Ways to Make Natural Hair Conditioner at Home: केस सॉफ्ट करण्यासाठी आपण सर्वच बाजारातील हेअर कंडिशनर वापरतो. पण त्यात केमिकल्स असतात. जे तुमच्या केसांना हानी पोहोचवू शकतात. यासाठी तुम्ही घरच्या घरी नैसर्गिक हेअर कंडिशनर वापरू शकता. हे बनवते सोपे आहे. तुम्ही या तीन पद्धतीने घरी नॅचरल कंडिशनर बनवू शकता.

ट्रेंडिंग न्यूज

Mango Jam: घरच्या घरी झटपट बनवा आंबट गोड मँगो जॅम, मुलांसह मोठ्यांना आवडेल ही रेसिपी

Gallbladder Stone: पित्ताशयातील खडे आणि त्याबाबत आहेत अनेक गैरसमज, जाणून घ्या तज्ज्ञांकडून

Vitamin B12 Deficiency: व्हिटॅमिन बी१२ च्या कमतरतेमुळे होऊ शकते पाठदुखी, जाणून घ्या कसे करावे उपचार

Litchi Shake: उन्हाळ्यात काही खास प्यावेसे वाटत असेल तर बनवा लिची शेक, खूप सोपी आहे रेसिपी

१. खोबरेल तेल, दही आणि मध कंडिशनर

हे बनवण्यासाठी एक चमचा खोबरेल तेल, एक चमचा मध, एक चमचा लिंबाचा रस, दोन चमचे दही आणि एक चमचा गुलाब जल घ्या. या सर्व गोष्टी नीट मिक्स करा आणि शॅम्पू केलेल्या केसांना लावा. हे कंडिशनर १५ ते २० मिनिटे राहू द्या आणि नंतर थंड पाण्याने धुवा.

२. एलोवेरा हेअर कंडिशनर

ते बनवण्यासाठी चार चमचे एलोवेरा जेल, एक चमचा लिंबाचा रस मिक्स करा. दोन्ही साहित्य चांगले मिक्स करा आणि गुळगुळीत पेस्ट बनवा. हे शॅम्पू केलेल्या केसांवर लावा आणि कोमट पाण्याने धुवा.

३. अॅपल सायडर व्हिनेगर कंडिशनर

ते बनवण्यासाठी दोन चमचे अॅपल सायडर व्हिनेगर, एक चमचा मध आणि दोन कप पाणी घ्या. सर्व साहित्य नीट मिक्स करा आणि गुळगुळीत पेस्ट बनवा. ते तुमच्या शॅम्पू केलेल्या केसांच्या लांबीवर लावा. ते टाळूवर लावू नका. १५ ते २० मिनिटांनी थंड पाण्याने धुवा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

विभाग

पुढील बातम्या