मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  जपानच्या शाही कुटुंबाने Instagram वर अकाउंट उघडताच अख्ख्या देशभरात का होतय कौतुक! काय आहे प्रकरण?

जपानच्या शाही कुटुंबाने Instagram वर अकाउंट उघडताच अख्ख्या देशभरात का होतय कौतुक! काय आहे प्रकरण?

Apr 02, 2024, 02:16 PM IST

  • जपानच्या राजघराण्याने इन्स्टाग्रामवर पदार्पण करताच देशातील नागरिक त्यांचं कौतुक करत आहेत. नावापुरती उरलेली जगातील सर्वात जुनी राजेशाही आता तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसतेय.

Japan’s Imperial Family made an Instagram debut on Monday, (AP)

जपानच्या राजघराण्याने इन्स्टाग्रामवर पदार्पण करताच देशातील नागरिक त्यांचं कौतुक करत आहेत. नावापुरती उरलेली जगातील सर्वात जुनी राजेशाही आता तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसतेय.

  • जपानच्या राजघराण्याने इन्स्टाग्रामवर पदार्पण करताच देशातील नागरिक त्यांचं कौतुक करत आहेत. नावापुरती उरलेली जगातील सर्वात जुनी राजेशाही आता तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसतेय.

सोशल मीडियाच्या वैश्विक चावडीवर जगातला प्रत्येकच जण आपलं म्हणण मांडू इच्छितो. काल परवापर्यंत सोशल मीडियाला हिणवणारे किंवा ‘आम्ही जरा वेगळे आहोत..’, असं म्हणणारे सुद्धा तासंतास सोशल मीडियावर वेळ घालवताना दिसताएत. जपानच्या राजघराण्याने सोमवारी पहिल्यांदा इन्स्टाग्रामवर अकौंट ओपन केलं. आणि त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला. जपानच्या तरुणांईपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा चांगला उपयोग होईल, असं या राजघराण्याला आता वाटू लागलं आहे. राजघराण्याकडून इन्स्टाग्राम अकौंटवर अनेक पोस्ट टाकण्यात आल्या असून देशवासीयांकडून त्यावर लाइक्सचा वर्षाव होतोय.

ट्रेंडिंग न्यूज

World Hypertension Day 2024: का साजरा केला जातो वर्ल्ड हायपरटेन्शन डे? जाणून घ्या इतिहास आणि यावर्षीची थीम

Ovarian Cancer: वेळेवर तपासणी केल्याने ओव्हेरियन कॅन्सरवर मात करणे शक्य, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Kadhi Recipe: उडीद आणि बेसन घालून बनवा छत्तीसगडची प्रसिद्ध कढी, झटपट तयार होते ही रेसिपी

Thick Eyelashes: पापण्या दाट आणि लांब करण्यासाठी करा हे उपाय, वाढेल डोळ्यांचे सौंदर्य

काल, सोमवारी सकाळी Kunaicho_jp हे अकौंट इन्स्टाग्रामवर उघडल्यानंतर सायंकाळपर्यंत त्यांच्या व्हेरिफाइड अकाऊंटचे ४ लाख ९० हजाराहून अधिक फॉलोअर्स झाले होते. जपानची सरकारी 'इंपीरियल हाऊसहोल्ड एजन्सी' राजघराण्याचे इन्स्टाग्राम अकौंट हाताळते. या एजन्सीद्वारे जपानचे सम्राट नारुहितो आणि महाराणी मासाको यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांचे तब्बल ६० फोटो आणि पाच व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

म्हणून केली इन्स्टाग्रामची निवड

जपानमध्ये लोकशाही पद्धतीने निवडणुका होत असल्या तरी शाही परिवाराला एक मानाचे स्थान असते. शाही कुटुंबातील सदस्य औपचारिक आणि सामाजिक कर्तव्ये पार पाडत असतात. जपान सरकारच्या कामकाजात त्यांची कोणतीही भूमिका नसते. जपानच्या शाही कुटुंबियांच्या कामाबद्दल नागरिकांना अधिक चांगली माहिती व्हावी यासाठी सध्या तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या इन्स्टाग्रामची निवड करण्यात आल्याचं इंपीरियल हाऊसहोल्ड एजन्सीकडून सांगण्यात आलं.

राजघराण्याकडून इन्स्टाग्रामवर टाकण्यात आलेल्या पहिल्या फोटोमध्ये शाही जोडपं त्यांच्या २२ वर्षीय मुलीसोबत सोफ्यावर बसलेले दिसत आहे. शिवाय ब्रुनेईचे राजकुमार हाजी अल-मुहतादी बिल्लाह आणि त्यांची पत्नी यांच्यासह दुसरा फोटो टाकण्यात आला होता. २३ फेब्रुवारी रोजी जपानचे राजे नारुहितो यांचा वाढदिवस होता. यानिमित्त त्यांनी आपल्या शुभचिंतकांना संबोधित करतानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता.

आतापर्यंत केवळ शाही कुटुंबियांच्या भेटीगाठी तसेच अधिकृत कर्तव्य याविषयीचेच फोटो टाकण्यात आले आहेत. शाही कुटुंबियांच्या खाजगी समारंभाच्या फोटोंचा यात समावेश नाही. यापुढे शाही कुटुंबातील इतर सदस्यांच्या भेटीगाठी, समारंभाचे फोटो इन्स्टाग्रामवर टाकण्याचा विचार असल्याचे 'इंपीरियल हाऊसहोल्ड एजन्सीच्या प्रवक्त्याने सांगितले. अशाच प्रकारे ब्रिटनच्या राजघराण्याने २००९ साली X (अर्थात पूर्वीचे ट्विटर) वर अकौंट ओपन केले होते.

जपानचे विद्यमान सम्राट नारुहितो यांचे वडील, सम्राट एमेरिटस अकिहितो यांनी २०१९ मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. सध्या जपानच्या राजघराण्याचे चाहतावर्ग हा खासकरून जुन्या पिढीतील नागरिक असल्याचे दिसून आले आहे.

सोशल मीडियाच्या वापरामुळे जपानच्या नागरिकांमध्ये राजघराण्याविषयी अधिक जवळीक निर्माण होण्यास मदत होऊ शकते, असं तज्ञांचे म्हणणे आहे. शाही कुटुंबियांच्या या अकाऊंटवरून कुणालाही फॉलो करण्यात आलेलं नाही. तसेच पोस्टखालील कमेंट बॉक्स बंद करण्यात आले आहे. त्यामुळे या अकौंटवरून जनतेशी दुतर्फा संवाद साधला जाणार नाही. नागरिक केवळ पोस्ट, फोटोवर ‘लाइक’ बटण दाबू शकतात. ज्यांना जपानच्या शाही कुटुंबाला संदेश पाठवायचा असल्यास त्यांना अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा लागेल.

जपानची राजेशाही ही जगातील सर्वात जुनी, वंशपरंपरागत राजेशाही आहे. इम्पीरियल हाऊस नावाने ओळखल्या जाणाऱ्या राजघराण्यात आत्तापर्यंत पहिले सम्राट जिमू यांच्यापासून आत्ताचे राजे नारुहितो यांच्यापर्यंत एकूण १२६ राजे झाले होऊन गेले आहेत. जपानच्या घटनेनुसार सम्राट हे देशाचे आणि लोकांच्या ऐक्याचे प्रतीक मानले जाते.

पुढील बातम्या