मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Holi Color Remove Tips: होळीच्या रंगांनी अजिबात घाबरू नका! या टिप्सच्या मदतीने काढा हट्टी रंग

Holi Color Remove Tips: होळीच्या रंगांनी अजिबात घाबरू नका! या टिप्सच्या मदतीने काढा हट्टी रंग

Mar 07, 2023, 09:32 AM IST

    • Skin And Hair Care Tips: होळीच्या दिवशी तुमच्या केसांचा आणि त्वचेचा रंग काढण्यासाठी हे घरगुती उपाय करा. यामुळे तुमचे केस आणि त्वचा दोन्ही सुरक्षित राहतील आणि होळीचे रंगही सहज निघतील.
Holi 2023 (Freepik )

Skin And Hair Care Tips: होळीच्या दिवशी तुमच्या केसांचा आणि त्वचेचा रंग काढण्यासाठी हे घरगुती उपाय करा. यामुळे तुमचे केस आणि त्वचा दोन्ही सुरक्षित राहतील आणि होळीचे रंगही सहज निघतील.

    • Skin And Hair Care Tips: होळीच्या दिवशी तुमच्या केसांचा आणि त्वचेचा रंग काढण्यासाठी हे घरगुती उपाय करा. यामुळे तुमचे केस आणि त्वचा दोन्ही सुरक्षित राहतील आणि होळीचे रंगही सहज निघतील.

रंगपंचमी कोणाला आवडत नाही. रंगपंचमीला सगळेच रंगामध्ये रंगतात. पण रंग खेळताना केसांची आणि त्वचेची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. अनेकजण केस आणि त्वचेला नुकसान होते , त्यामुळे बहुतेक लोक होळीचे रंग टाळतात. पण या गोष्टीचा यंदा काहीही विचार न करता होळी जोमाने खेळा कारण आम्ही तुमच्यासाठी काही सोप्या टिप्स घेऊन आलो आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही होळीचा रंग काढू शकता.

ट्रेंडिंग न्यूज

Kedarnath Yatra: केदारनाथच्या आजूबाजूला आहेत ही सुंदर ठिकाणं, ती पाहिल्याशिवाय अपूर्ण राहील ट्रीप

Onion Pickle: जेवणासोबत सर्व्ह करा टेस्टी कांद्याचे लोणचे, प्रत्येक जण विचारेल रेसिपी

High Blood Pressure: अनियंत्रित रक्तदाबामुळे होऊ शकतात या समस्या, वेळीच घ्या काळजी

Health Tips: तेल वारंवार गरम केल्याने वाढतो कर्करोगाचा धोका, आयसीएमआरचा इशारा, किती दिवस जुने तेल वापरता येते?

त्वचेवरील रंग काढण्यासाठी

> होळी खेळल्यानंतर प्रथम चेहरा स्वच्छ पाण्याने वारंवार धुवा आणि नंतर क्लींजिंग क्रीम किंवा लोशन लावा. काही वेळाने ओल्या कापसाच्या मदतीने स्वच्छ करा. डोळ्यांच्या सभोवतालची जागा हलक्या हाताने स्वच्छ करायला विसरू नका. क्लिंजिंग जेल चेहऱ्यावर जमा झालेले रंग काढून टाकण्यासाठी खूप मदत करते.

> घरी बनवलेल्या क्लिंजरच्या मदतीने तुम्ही होळीचा रंग काढू शकता. हे करण्यासाठी अर्धा कप थंड दुधात ऑलिव्ह, तीळ किंवा कोणतेही वनस्पती तेल मिसळा. आता त्वचेवर जिथे रंग असेल तिथे हे मिश्रण कापसाच्या मदतीने लावा आणि स्वच्छ करा. तिळाच्या तेलाने मसाज करून त्वचेचा रंग सहज काढता येतो.

> बेसनाच्या फेस पॅकच्या मदतीनेही होळीचे रंग काढता येतात. यासाठी एका भांड्यात दोन चमचे बेसन, एक चमचा हळद आणि एक चमचा मलई एकत्र करून नीट मिक्स करा. आता ही पेस्ट तुमच्या त्वचेवर लावा आणि कोरडे झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा.

होळीच्या रंगांपासून केस कसे वाचवायचे?

> होळी खेळण्यापूर्वी केसांना हेअर सीरम किंवा कंडिशनर लावा. यामुळे गुलालाच्या रंगांमुळे होणार्‍या कोरडेपणापासून केसांचे संरक्षण होईल.

> थोडेसे हेअर क्रीम घेऊन दोन्ही तळहातांवर पसरवा आणि केसांना हलके मसाज करा. किंवा होळीचे रंग जाण्यापासून वाचवण्यासाठी तुम्ही केसांना खोबरेल तेल लावू शकता.

> होळी खेळल्यानंतर केस शॅम्पूने चांगले धुवा. यानंतर केसांना कंडिशनर लावा, नंतर केस पाण्याने स्वच्छ करून हेअर सीरम लावा. या उपायाने तुमच्या केसांमधील कोरडेपणा दूर होईल.

विभाग

पुढील बातम्या